आमदार सुभाष धोटेंनी केली पदयात्रेतून जनजागृती
आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क
राजुरा -
राजुरा तालुका काँग्रेसच्या वतीने लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वात स्वातंत्र्याच्या हीरक महोत्सव वर्षानिमित्त राजुरा तालुक्यातील धोपटाळा, रामपूर, माथरा, गोवरी, चिंचोली (खुर्द) कळमना, चंदनवाही ते पांढरपौणी पर्यंत आजादी गौरव पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेतून काँग्रेसने राष्ट्रीय काँग्रेसचा स्वातंत्र्य चळवळीतील संघर्ष, स्वातंत्र्य सैनिक, क्रांतिकारकांचे बलिदान, या ७५ वर्षात देशाच्या विकासात काँग्रेसचे योगदान इत्यादी अनेक विषयांवर जनजागृती केली. या पदयात्रेचे वरील सर्व गावांमध्ये स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त स्वागत केले आणि उत्तम प्रतिसाद देत सहभाग घेतला.
या प्रसंगी काँग्रेसचे विधानसभा समन्वयक माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, चंद्रपूर ग्रामीण युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनु धोटे, ओबीसी काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नंदकिशोर वाढई, कार्याध्यक्ष एजाज अहमद, महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष कविता उपरे, शहराध्यक्ष संतोष गटलेवार, शहराध्यक्षा संध्या चांदेकर, माजी सभापती कुंदाताई जेणेकर, युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष मंगेश गुरणुले, राजुरा युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ईरशाद शेख, माजी सरपंच राजु पिंपळशेंडे, राजाराम येल्ला, मंजुषा खंडाळे, वसंता ताजने, उषाताई उरकुडे, लहू चहारे, संदीप घोटेकर, शंकर घोटेकर, दिवाकर मोरे, महादेव ताजने, मारोती बोढेकर, आनंदराव धोटे,. अनंता एकडे, नागेश मेदर, सि. आर. सिंग, शिवराम लांडे, प्रभाकर येरणे, प्रभाकर बघेल, संतोष शेन्डे, ब्रिजेस जंगितवार, जगदीश बुटले, युवक काँग्रेसचे जिल्हा महासचिव प्रणय लांडे, संदीप आदे, उमेश गोरे , कोमल पुसाटे, विनोद कावडे, मधु सोयाम, अॅड. चंद्रशेखर चांदेकर, पर्यावरण अध्यक्ष योगिता भोयर, पुनम गिरसावडे, श्रीधर रावला, हारून शेख, यासह मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.