आमदार सुभाष धोटे, नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या उपस्थित उद्घाटन सोहळा
आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क
राजुरा -
लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या प्रयत्नाने राजुरा तालुक्यात मंजुर झालेल्या २ कोटी ७५ लक्ष निधीच्या विकास कामांचे भुमिपूजन व लोकार्पण आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते पार पडले. यात राजुरा येथील इंदिरा नगर वार्डातील खुल्या जागेत सभागृह बांधकाम करणे २०० लक्ष, भारत चौक राजुरा येथे शिंपी समाज भवनाचे बांधकाम करणे १५ लक्ष, रामनगर कॉलनी राजुरा येथे महिला बचत गट भवन बांधकाम करणे ३० लक्ष, रमानगर वार्ड येथे व्यायामशाळा इमारत बांधकाम करणे १० लक्ष, इंदिरानगर वार्ड येथे आय. टी. आय ते कब्रस्थान पर्यंत रस्ता डांबरीकरण करणे २० लक्ष, साईनगर वार्ड राजुरा येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सभागृहाचे लोकार्पण, सोमनाथपुर वार्ड येथील सभागृहाचे लोकार्पण आणि इंदिरा नगर येथील कब्रस्थान, वालकंपाऊंड, प्रवेशद्वार चे लोकार्पण इत्यादी विविध विकासकामांचा समावेश आहे.
या प्रसंगी माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, माजी उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष कविता उपरे, सेवादल अध्यक्ष दिनकर कर्णेवार, माजी नगरसेवक राधेश्याम अडानिया, शहराध्यक्ष संतोष गटलेवार, शहराध्यक्षा संध्या चांदेकर, यु.काँ. वि. अध्यक्ष मंगेश गुरनुले, माजी नगरसेवक प्रभाकर येरने, प्रा. डॉ. संजय गोरे, डॉ. बुरान, अॅड चंद्रशेखर चांदेकर, उमेश गोरे, आनंदराव ताजने, मत्ते सर, शालिक उरकुडे, मसे सर, जमीरभाई, मुनीरभाई, राजीक शेख, मतीन कुरेशी, सय्यद साबीर, विनोद कावडे, अॅड. राजेंद्र जेणेकर, धनराज चिंचोलकर, प्रवीण बुक्कावार, संजय जयपुरकर, भटारकर बाबु, चावरे बाबु, हेपट सर, इटणकर, इंदूताई निकोडे, पुनम गिरसावळे, ज्योती शेंडे, निता बानकर, ज्युली नामेवार, सौ. गटलेवार, सौ. आईटलावार, विना गोप, सागर रांचरलावार, सारंग रामगिरवार, गुलशन रामगिरवार, संतोष रामगिरवार, प्रवीण रांचरलावार, चंद्रकात रांचरलावार, आक्केवार यासह स्थानिक नागरिक उपस्थीत होते.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.