Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: त्या अडकलेल्या लोकांना खाण्याचे साहित्य पोहचविले
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
त्या अडकलेल्या लोकांना खाण्याचे साहित्य पोहचविले मंद गतीने ओसरत आहे पूर अजूनही अनेक मार्ग ठप्प बारा घरांची पडझड आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क ...
त्या अडकलेल्या लोकांना खाण्याचे साहित्य पोहचविले
मंद गतीने ओसरत आहे पूर
अजूनही अनेक मार्ग ठप्प
बारा घरांची पडझड
आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क
राजुरा -
अतिवृष्टीमुळे आलेला पूर आता ओसरत असला तरी त्याची गती मंदावलेली आहे. गुरुवारी सायंकाळपासूनच नद्या, ओढ्यावरील पाणी ओसरायला सुरुवात झाली होती मात्र पाणी ओसरण्याची गती अत्यंत कमी होती. पाणी ओसरत असल्याचे लक्षात येताच नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला. पाणी ओसरत असले तरी वर्धा नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे अजूनही राजुरा-बल्लारपूर मार्ग बंद आहे. संततधार पावसामुळे शेकडो शेतकऱ्यांच्या शेतातील पिके पाण्याखाली गेले असून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. प्रशासन सतर्क असून अन्नधान्यासह सर्व व्यवस्था करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. 
दरम्यान आज राजुरा-चंद्रपूर राज्य मार्गावरील पुलावर पाणी आहे. या मार्गावर साई मंदिर जवळ काही नागरिक अडकून पडले आहेत. गुरुवारी तहसील प्रशासनाने त्यांना आणण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन टीम पाठवून तेथून आणण्याचा प्रयत्न केला होता मात्र तेथील लोकांनी आमच्याकडे खाण्यापिण्याचे सर्व साहित्य असून सुरक्षित असल्याचे सांगितले. आज त्या नागरिकांकरिता तहसीलदार हरीश गाडे यांच्या मार्गदर्शनात मंडळ अधिकारी निरंजन गोरे, तलाठी विल्सन नांदेकर व कोतवाल यांनी तीन मासे पकडणाऱ्यांच्या साहाय्याने खाण्याचे साहित्य आणि पाण्याची कॅन पाठविली. 
संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान झाले तर काही भागात घरांची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे यात राजुरा येथील ४, चुनाळा येथील ४, रामपूर येथील दोन, कापनगाव येथील १ आणि बामणवाडा येथील एका घराचा समावेश आहे. आता पुन्हा एकदा शेतकरी प्रचंड संकटात सापडला असून अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साठले असून त्यांचे कपाशी व सोयाबीन नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. दुबार पेरणीच्या संकटाला समोर गेलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा अस्मानी संकटाला तोंड द्यावे लागत आहे. नदी व ओढयांना पूर आल्याने सास्ती, कोलगाव, बाबापूर, मानोली, गोवरी, कढोली, चार्ली, निर्ली, धिडशी, मारडा, कुर्ली, जैतापूर, चुनाळा, सातरी, चनाखा, विहिरगाव, मूर्ती, नलफडी, सिंधी, धानोरा, चिंचोली, कविटपेठ,पंचाळा, धानोरा यासह अन्य गावातील शेतात पुराचे पाणी पसरले आहे. गेल्याने पीक पाण्याखाली आले आहे. उभ्या पिकासह शेतजमीन खरवडून जाण्याच्या भीतीनं शेतकरी चिंता व्यक्त करीत आहेत.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top