Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: राजूराच्या युवतीला व्हाट्सअप वरून अश्लील एसएमएस
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
राजूराच्या युवतीला व्हाट्सअप वरून अश्लील एसएमएस  ऑनलाईन कर्ज घेणे महागात पडले - अज्ञाता विरुद्ध गुन्हा दाखल आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क राजु...

राजूराच्या युवतीला व्हाट्सअप वरून अश्लील एसएमएस 
ऑनलाईन कर्ज घेणे महागात पडले - अज्ञाता विरुद्ध गुन्हा दाखल
आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क
राजुरा -
राजुरा तालुक्यातील एका गावातील युवतीला वेगवेगळ्या मोबाईल नंबर वरून व्हाट्सअप वर अश्लील एसएमएस पाठवून बदनाम करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या युवतीला ऑनलाईन कर्ज घेणे चांगलेच महागात पडले आहे. सततच्या बदनामीने त्रस्त झालेल्या या युवतीने अखेर राजुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अनोळखी इसमा विरोधात गुन्हा दाखल केला आहे.    
मिळालेल्या माहिती नुसार एका युवतीने 'एप लोन' यावरून ऑनलाईन कर्ज घेतले. याकरीता सांगण्यात आल्या प्रमाणे तिने वैयक्तिक माहिती पाठवली. त्यानंतर तिने नियमित कर्जाचा भरणा सुद्धा केला. मात्र मागील काही दिवसांपासून तिच्या व्हाट्सअप वर वेगवेगळ्या मोबाईल नंबर वरून अश्लील एसएमएस, व्हिडिओ पाठवण्यात येत असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला. सोबतच घाणेरड्या शिवीगाळ करून वाईट शब्दात तिची बदनामी करीत आहे. तिच्या संपर्कात असलेले मोबाईल नंबर 'हॅक' करून तुझ्या विषयी असलेले अश्लील एसएमएस नातेवाईकांना पाठवण्याची धमकी देण्यात असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या सततच्या कॉल व व्हॉटसअँप द्वारे अश्लील प्रकार होत असल्याने युवतीची समाजात बदनामी होत असून अखेर या युवतीने पोलिसांत धाव घेतली आहे. तक्रारीवरून पोलिसांनी अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top