Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: पुराचे पाणी गोट फॉर्ममध्ये शिरल्याने १६ बकऱ्यांचा मृत्यू
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
पुराचे पाणी गोट फॉर्ममध्ये शिरल्याने १६ बकऱ्यांचा मृत्यू आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क राजुरा - बामणी-राजुरा मार्गालगतच्या मोहम्मद शबीर यांच्य...
पुराचे पाणी गोट फॉर्ममध्ये शिरल्याने १६ बकऱ्यांचा मृत्यू
आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क
राजुरा -
बामणी-राजुरा मार्गालगतच्या मोहम्मद शबीर यांच्या मालकीच्या शेतातील गोट फॉर्म येथे नेहमी प्रमाणे सत्तावीस बकऱ्या होत्या, पुराचे पाणी आपल्या शेतात येणार नाही या भ्रमाने त्यांना आपत्ती व्यवस्थापन च्या कर्मचाऱ्यांना सांगितले मात्र अचानक पुराचे पाणी वाढले आणि गोट फॉर्म मध्ये शिरले तेव्हा मोहम्मद शब्बीर हे स्वतःचा जीव वाचवित नजीकच्या साई मंदिर येथे आश्रय घेऊन थांबले. पाणी वाढत असल्याने पुराचे पाणी गोट फॉर्म मध्ये शिरले आणि यात सत्तावीस पैकी पंधरा बकऱ्या मरण पावला यात एका बकरीने लहान पिल्याला जन्म दिला ते पिल्लू सुद्धा पाण्यात मरण पावले उर्वरित बारा बकऱ्या यात जिवंत वाचल्या असल्या तरी मोहम्मद शबीर यांचे मोठे नुकसान झाले.
बल्लारपूर येथील बुद्ध नगर मध्ये राहणारा मोहम्मद शबीर यांनी राजुरा बामणी मार्गावर शेत घेऊन त्या ठिकाणी शेती पूरक व्यवसाय म्हणून शेळी पालन चा व्यवसाय सुरू केला. मागील दहा दिवसांपासून सतत सुरू असलेल्या पावसाने नदी नाले ओसंबून वाहत होते. वर्धा नदी दुथडी झाल्यानंतर बामणी-राजुरा मार्गावरील पुलिया पाण्याखाली गेल्याने राजुरा कडे येणाऱ्या मार्गावर पुराचे पाणी आल्यामुळे मधातच मार्ग बंद झाला यामुळे आपत्ती व्यवस्थापन पथकाला गोट फॉर्म पर्यंत पोहचता आले नाही. 
साई मंदिर परिसरात आश्रय घेऊन असलेले मोहम्मद शबीर यांना आपत्ती व्यवस्थापन पथकाने सुरक्षित स्थळी येण्यास सांगितले असता आपल्या बकऱ्यांच्या दृष्टीने त्यांनी तिथेच राहणे पसंद केले. पुराचे पाणी ओसरल्यानंतर महसूल चे कर्मचारी गोट फॉर्म पर्यंत जाऊन पोहचले असता त्या ठिकाणी पंधरा बकऱ्या आणि एक छोटेसे बकरीचे पिल्लू मृत होते तर बारा बकऱ्या जिवंत असल्याचे दिसून आल्या. 
तहसीलदार हरीश गाडे, मंडळ अधिकारी निरंजन गोरे, तलाठी विल्सन नांदेकर, पशुवैद्यकीय अधिकारी जिल्हेवार, आक्रोश जुलमे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. यात शेळी मालकाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top