Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: माजी उपनगराध्यक्ष सचिन भोयर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
माजी उपनगराध्यक्ष सचिन भोयर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी कोरपना - औद्योगिक नगरी गडचांदूर येथील पहिले ...
माजी उपनगराध्यक्ष सचिन भोयर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
कोरपना -
औद्योगिक नगरी गडचांदूर येथील पहिले उपनगराध्यक्ष तथा युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख सचिन भोयर यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत शनिवारी राजुरा येथे शिवाजी संकुलमध्ये झालेल्या काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला.
खासदार बाळू धानोरकर आमदार सुभाष धोटे, आमदार अभिजीत वंजारी, माजी आमदार अविनाश वारजूकर, चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश देवतळे, गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत सचिन भोयर यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला. त्यांच्या पक्ष प्रवेशाने काँग्रेस पक्षाला बळकटी मिळाली असून गडचांदूरसारख्या मोठ्या लोकसंख्येच्या शहरात काँग्रेस पक्षाला चांगला चेहरा मिळाला आहे.
आपण पक्षासाठी एकनिष्ठेने काम करू व पक्षाने दिलेली प्रत्येक धुरा जबाबदारीने सांभाळून असे प्रतिपादन सचिन भोयर यांनी प्रवेशादरम्यान केले. कार्यक्रमाचे संचालन आशिष देरकर यांनी केले.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top