Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: 'काय ते सिलेंडर, काय ती महागाई आणि काय ते भाजप सरकार' म्हणत
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
'काय ते सिलेंडर, काय ती महागाई आणि काय ते भाजप सरकार' म्हणत  वाढत्या महागाई विरोधात बल्लारशाह शहरात महिला काँग्रेसचे धरणे आंदोलन.......
'काय ते सिलेंडर, काय ती महागाई आणि काय ते भाजप सरकार' म्हणत 
वाढत्या महागाई विरोधात बल्लारशाह शहरात महिला काँग्रेसचे धरणे आंदोलन.....
डी.एस. ख्वाजा - आमचा विदर्भ प्रतिनिधी 
चंद्रपूर -
वाढत्या महागाई विरोधात काँग्रेस महिला आघाडी आता अधिकच आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे, काही दिवसांपूर्वी भारतामधील तेल कंपन्यांनी घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती कमी केल्यानंतर काल पुन्हा सर्वसामान्य नागरिकांना महागाईची झळ बसली आहे. घरगुती गॅस सिलेंडरचे दर 50 रुपयांनी वाढले आहे. याच महागाई विरोधात बल्लारशाह शहरातील महिला काँग्रेसने आज महीला तालुका अध्यक्षा अफसाना सय्यद, तालुका उपाध्यक्ष सुगंधा प्रितम पाटील, यांच्या नेतृत्वात मोदी सरकार विरोधात आंदोलन करण्यात आले आहे. या आंदोलनात शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजी बापू पाटील यांचा गाजलेला डायलॉग वापरत 'अरे काय ते सिलेंडर, काय ती महागाई आणि काय ते भाजप सरकार' म्हणत या आंदोलन करणाऱ्या महिलांनी मोदी सरकारला टार्गेट केल आहे. तसेच आंदोलनकर्त्यांनी केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत. गॅस दरवाढ मागे घेण्याची मागणी केली आहे.
आठ वर्षांपुर्वी गॅसचा दर हा 600 रुपये होता आणि आता गॅस 1053 रुपयांना मिळतो आहे. भाजप सरकार जेव्हा विरोधी बाकावर होतं तेव्हा गॅसच्या किंमती वाढल्या तर सातत्याने आंदोलनं आणि मोर्चा करायचे. त्यामुळे आम्हीसुद्धा तीच मागणी करत आहोत. अर्थमंत्री निर्मला सितारामण आणि दरवेळी गॅससाठी आंदोलन करणाऱ्या भाजप नेत्या स्मृती ईराणी या संसार करतात त्यांना देखील महिलेच्या कामाकाजाचा अनुभव आहे. मोदींना यात बोलण्यात काही एक अर्थ नाही कारण मोदींना घरच नाही त्यामुळे त्यांना सर्वसामान्यांच्या भावना कळू शकणार नाही, असं मत महिला काँग्रेसच्या तालुका उपाध्यक्ष सुगंधा प्रितम पाटील यांनी व्यक्त केलं आहे.
गेली काही दिवस राज्यात काय सत्तानाट्य सुरु आहे हे सगळ्या महाराष्ट्रात माहिती आहे. सातत्याने आमदारांचे रेट काय होते हे आम्हाला कळत होतं. 50 कोटी हा आकडा आम्हाला ऐकू आला. त्याचीच भरपाई नागरिकांकडून केली जात आहे का? असा प्रश्न तालुका महीला काॅंग्रेसच्या अध्यक्षा अफसाना‌ सय्यद‌ यांनी उपस्थित केला. घरकामातील वस्तुंची किंमत वाढली की महिलेचं महिन्याभराचं कामकाज बिघडते. हिशोब बिघडतो. त्यामुळे लवकरात लवकर गॅसचे दर कमी करा, अशी मागणी बल्लारशाह कॉंग्रेसच्या महिला नेत्यांनी केली आहे.
या वेळी महिला काॅंग्रेसच्या नम्रता ठेमस्कर, सव्वालाखे, मनिशा पोहनकर, मोहीनी दारूंन्डे, ज्योती वानखेडे, अफसाना शेख, शाहीदा खान, रजीया कुरेशी, जायेदा अली, आशा बोरसरे, कवीता गुरनुले, जहुरा शेख, पुष्पा गुरनुले, प्रविन पठान, सिता आत्राम, छाया आत्राम, अलीमुन कुरेशी, जाहानुर शेख, फातीमा सय्यद, नरगीस सय्यद, शबनम पठान, महेजबीन पठान, सुनिता साखरकर, शामा पठान, कमला जलमपल्लीवार, नुरजाहा कुरेशी, शोभा दुर्गे सह असंख्य महिला‌ काॅंग्रेसच्या कार्यकर्त्या उपस्थीत होत्या.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top