आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मृतकाच्या कुटूंबियांना केला अर्थसहाय्याचा धनादेश सुपुर्द
आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क
चंद्रपूर -
दिनांक ०५ जुलै २०२२ रोजी बल्लारपूर तालुक्यातील कोर्टीमक्ता येथील सचिन दादाजी गायकवाड या तरुणाचा ट्रकच्या धडकेने मृत्यु झाला. या घटनेची तातडीने दखल घेत माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी भाजपाच्या माध्यमातुन मृतकाच्या कुटूंबियांना तात्पुरत्या अर्थसहाय्य प्रदान केले. त्यावेळी भाजपा पदाधिकारी राजु बुध्दलवार, माजी जि.प. सदस्या सौ. वैशाली बुध्दलवार, रुपेश पोडे, रमेश पिपरे आदींनी मृतकाच्या कुटूंबाला मुख्यमंत्री निधीतुन अर्थसहाय्य मंजुर करण्याची विनंती आ. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली. आ. सुधीर मुनगंटीवार तातडीने पुढाकार घेत याप्रकरणी मुख्यमंत्री निधीतुन दोन लाख रुपयांचे अर्थसहाय्य मंजुर केले. सदर रकमेचा धनादेश दि. २१ जुलै रोजी मृतकाच्या कुटूंबियांना आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती संध्याताई गुरनुले, तहसीलदार श्री राईचवार आदिंची उपस्थिती होती.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.