Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: बल्लारशाह - लोकमान्य टिळक टर्मिनल रेल्वेचे जल्लोषात स्वागत
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
बल्लारशाह - लोकमान्य टिळक टर्मिनल रेल्वेचे जल्लोषात स्वागत एच.एन. (राजेश) अरोरा प्रतिनिधी बल्लारपूर - मध्य रेल्वेने आज बहुप्रतिक्षित बल्लारश...
बल्लारशाह - लोकमान्य टिळक टर्मिनल रेल्वेचे जल्लोषात स्वागत
एच.एन. (राजेश) अरोरा प्रतिनिधी
बल्लारपूर -
मध्य रेल्वेने आज बहुप्रतिक्षित बल्लारशाह-लोकमान्य टिळक टर्मिनल ट्रेन सुरू करून प्रवाशांना एकमोठा दिलासा दिला आहे. या गाडीचे आज बल्लारशाह रेल्वे स्थानकावर जल्लोषात स्वागत करण्यात आले. कोरोना संकटापूर्वी बल्लारशाह ते मुंबई अशी रेल्वे धावत होती. ती बंद पडल्याने प्रवाशांना या मार्गावर प्रवास करताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या अथक प्रयत्नाने आणि ZRUCC, DRUCC सदस्य, चंद्रपूर जिल्हा रेल्वे प्रवासी संघ बल्लारशाह ने प्रवाशांची होणारी गैरसोय वारंवार निदर्शनास आणून दिल्यानंतर आजपासून ही नवीन विशेष गाडी सुरु झाली आहे.
ही रेल्वे सुरु झाल्याने जियमित प्रवास करणारे कामगार विद्यार्थी, छोटे व्यापारी, बल्लारशाह ते मुंबई प्रवास करणारे ग्रामस्थ यांची मोठी सोय होणार आहे. नविन सुरुझालेली ही ट्रेन, गाड़ी नंबर ११२६, लोकमान्य टिळक वाजुन ४५ मिनिटांनी सुटेल व बल्लारशाह येथे दुसऱ्या दिवशी दुपारी १२ वाजून १० मिनिटांनी पोहचेल, आणि गाड़ी क्रमांक १९२८ त्याच दिवसी दुपारी १ वाजुन ४० मिनिटांनी बल्लारशाह येथूब लोकमान्य टिळक टर्मिनल साथी सुटेल व सकाळी १ वाजता पोहचेल, सध्या ही गाडी साप्ताहिक सुरु करण्यात आलेली आहे. •अवैधगोवंशाची तस्करी करणारे दोन वाहने जप्त
दारूटुकान स्थलांतरण व मजूरीची देवाण-घेवाण कोटींच्या घरात. ट्रेज बल्लारशाह रेलवे स्टेशन वर पोहचताच जल्लोषात स्वागत करण्यात आले. या वेळी ट्रेन चे लोको पायलट यांचा शाल, श्रीफल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले,आणि उपस्थितांना पेढे देऊन आनंद व्यक्त करण्यात आला, या ठिकाणी मोठ्या संख्येने शहरातील मान्यवर मंडळी उपस्थित होते.
प्रामुख्याने महाराष्ट्र वनविकास महामंडळाचे माजी अध्यक्ष तथा भाजपचे ज्येष्ठ नेते चंदनसिंह चंदेल, नगराध्यक्ष हरीश शर्मा, ZRUCC सदस्य श्रीनिवास सुंचवार, DRUCC सदस्य विकास राजूरकर, प्रशांत मोरे, ज्ञानेंद्र आर्या, गणेश सैदाने, भाजप चे काशी सिंह द्विवेदी महाराज, मनीष पांडे, समीर केने, राजू दारी, विक्की दुपारे, मेघनाथ सिंह, रेलवे चे मुख्य वाणिज्य निरीक्षक कृष्णकुमार सेन, स्टेशन मास्टर ए.यु.खान आदी उपस्थित होते.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top