Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: कार्यकर्ता हाच पक्षाची ताकद - आ. सुधीर मुनगंटीवार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
कार्यकर्ता हाच पक्षाची ताकद - आ. सुधीर मुनगंटीवार रैय्यतवारी येथील नागरिकांचा भाजपात प्रवेश शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी चंद्रपूर - चंद...
कार्यकर्ता हाच पक्षाची ताकद - आ. सुधीर मुनगंटीवार
रैय्यतवारी येथील नागरिकांचा भाजपात प्रवेश
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
चंद्रपूर शहरातील रैय्यतवारी येथील महिला व पुरुषांनी महाराष्ट्र विधीमंडळ लोकलेखा समिती प्रमुख आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात महानगर सचिव उमेश आष्टनकर यांच्या पुढाकाराने भारतीय जनता पार्टी मध्ये पक्ष प्रवेश केला. यावेळी आ.मुनगंटीवार यांनी सांगितले की कार्यकर्ता हाच भारतीय जनता पक्षाची खरी ताकद असून तो सेवाभावी वृत्तीने काम करणारा आहे. कार्यकर्ता सामान्य माणसाच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव तत्पर असतो व कार्यकर्त्यांच्या परिश्रमामुळेच आज भारतीय जनता पक्ष हा जगातील सर्वात मोठा पक्ष असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सदर पक्ष प्रवेश कार्यक्रमात महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, महामंत्री ब्रिजभूषण पाझारे, सुभाष कासनगोट्टवार, सचिव राकेश बोमनवार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. पक्ष प्रवेश केलेल्या महिला व पुरुषांमध्ये विद्या बोढेे, इंदिरा बारेकर, शुभांगी बारेकर, सुनील सिंह, संजय बोढे, वैशाली पारशिवे, कलावती तालारी, रामेश्वरी बोईनी, शोभा पारशिवे, व्यंकटेश गप्पाल, उज्वला गप्पाल, नारायण पारशिवे, रत्नमाला नागपुरे, वंदना तोहगावकर, शामराव तोहगावकर यांचा समावेश आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top