Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: अन्न पुरवठा विभागाची रेशनकार्ड ऑनलाईन साईड गतिमान करा - यंग चांदा ब्रिगेडची मागणी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अन्न पुरवठा विभागाची रेशनकार्ड ऑनलाईन साईड गतिमान करा - यंग चांदा ब्रिगेडची मागणी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत अन्न नागरी पुरवठा मंत्री छगण भुजबळ य...
अन्न पुरवठा विभागाची रेशनकार्ड ऑनलाईन साईड गतिमान करा - यंग चांदा ब्रिगेडची मागणी
जिल्हाधिकाऱ्यांमार्फत अन्न नागरी पुरवठा मंत्री छगण भुजबळ यांना निवेदन
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
अन्न पुरवठा विभागाची रेशनकार्ड ऑनलाईन करण्यासाठी अस्तित्वात असलेली एइपीडिएस ही साईड अनेक दिवसापासून सुरळीत चालत नसल्याने सामान्य नागरिकांना आपल्या हक्क व अधिकारापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे सदर साईड गतीमान करण्यात यावी अशी मागणी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली असुन सदर मागणीचे निवेदन त्यांच्या वतीने जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांच्या मार्फत अन्न नागरी पुरवठा मंत्री छगण भुजबळ यांना पाठविण्यात आले आहे.
रेशनकार्ड ऑनलाईन करण्यासाठी अस्तित्वात असलेली एइपीडिएस ही साईड तांत्रीक अडचणीमुळे सुरळीत सुरु नाही. त्यामुळे नागरिकांची रेशनकार्ड संदर्भात असलेली सर्व कामे ठप्प झाली आहे. परिणामी कार्ड धारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामध्ये रेशनकार्ड ऑनलाईन करणे, नाव कमी करणे, नाव वाढविणे, नविन आर. सी. देणे असे नागरिकांची विविध कामे प्रभावीत झाली आहे. विशेष म्हणजे तांत्रीक बिघाडामुळे चंद्रपुरातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात ही स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिक संतापून विभागातील स्थानिक अधिकारी, कर्मचारी यांचेवर रोष व्यक्त करीत आहे. सदर प्रकार हा वरिष्ठ स्तरावरील तांत्रिक बिघाड असल्याने निर्माण झाला असल्याने याकडे जातीने लक्ष देत हि तांत्रीक अडचण दुर करावी अशी मागणी सदर निवेदनाच्या माध्यमातुन ना. छगण भुजबळ यांना करण्यात आली आहे. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे, शहर संघटक विनोद अनंतवार, मुन्ना जोगी, सिध्दार्थ मेश्राम, महेश चहारे आदिंची उपस्थिती होती.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top