Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: राष्ट्रीय ऐक्यासाठी राष्ट्रसंतांच्या विचारांची देशाला गरज - माजी नगराध्यक्ष अरुण धोटे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
राष्ट्रीय ऐक्यासाठी राष्ट्रसंतांच्या विचारांची देशाला गरज - माजी नगराध्यक्ष अरुण धोटे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चौक फलक अनावरण आमचा विदर्भ -...

  • राष्ट्रीय ऐक्यासाठी राष्ट्रसंतांच्या विचारांची देशाला गरज - माजी नगराध्यक्ष अरुण धोटे
  • राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चौक फलक अनावरण
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपल्या कीर्तनातून भजनातून समाजाला जागृत करण्याचे काम केले. अनिष्ट चालीरीती, परंपरा व्यसनाधीनता, जाती निर्मूलन करण्यासाठी किर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन केले. खेड्यांचा विकास म्हणजे देशाचा विकास केंद्रबिंदू मानून ग्रामगीतेची रचना केली. देशातील सर्व धर्मियांना एकत्र जोडण्याचे काम राष्ट्रसंतांनी केले. राष्ट्रीय ऐक्यासाठी मानवता धर्माची शिकवण दिली. देशाच्या प्रगतीसाठी राष्ट्रसंताच्या विचाराची गरज आहे असे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी राजुरा येथे केले.
देशपांडे वाडी, भडखांब येथे आयोजित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चौक फलक अनावरणाच्या कार्यक्रमाप्रसंगी अरुण धोटे बोलत होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंतीनिमित्त फलक अनावरणाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष अरुण धोटे होते. प्रमुख अतिथी म्हणून श्री गुरुदेव सेवा मंडळाचे तालुकाध्यक्ष अँड. राजेंद्र जेनेकर, उपतालुका सेवा अधिकारी लटारू मते, चंद्रपूर जिल्हा महिला प्रमुख अँड.सौ. सारिका जेणेकर, तालुका संघटक सुभाष पावडे ,शैलेश कावळे, बळीराम बोबडे, प्रभाकर बोभाटे, रमेश भोयर, ज्योतीताई शेंडे, नरेंद्र मोहारे, उमेश गोरे, ज्येष्ठ नागरिक टिकले, अँड. मारुती कुरवटकर, संगीता मोहूर्ले, विनोद मोहूर्ले यांची मंचावर उपस्थिती होती. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंतीनिमित्त श्री गुरुदेव सेवा मंडळ व स्थानिक महिला व नागरिकांनी सकाळी ग्रामस्वच्छता अभियान घेण्यात आला. त्यानंतर भजनावली चा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. सायंकाळी सामूहिक प्रार्थनेनंतर माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या हस्ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चौक फलक अनावरण करण्यात आले. यावेळी वार्डातील नागरिक व श्री गुरुदेव सेवा मंडळाचे उपासक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात माजी नगराध्यक्ष अरुण धोटे व ज्येष्ठ नागरिक टिकले यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी एडवोकेट मारुती कुरवटकर यांनी प्रास्ताविकातून वार्डाच्या सर्वांगीण विकासासाठी चौकाच्या सौंदर्यीकरण करण्याची मागणी केली. माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी या वार्डाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे आश्वासन दिले. ओपन स्पेस चे सौंदर्यीकरण व मूलभूत सुविधा प्राधान्याने निर्माण करण्यात येतील असे आश्वासन याप्रसंगी दिले. कार्यक्रमाचे संचालन आनंद चलाख यांनी केले तर आभार बळीराम बोबडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते, महिला व नागरिकांचे सहकार्य लाभले.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top