Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: राणगव्याच्या हल्यात एक गंभीर जखमी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
राणगव्याच्या हल्यात एक गंभीर जखमी आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स पोंभुर्णा - तालुक्यातील बोर्डा बोरकर येथील तेंदु संकलनासाठी गेलेल्या इसमावर...

  • राणगव्याच्या हल्यात एक गंभीर जखमी
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
पोंभुर्णा -
तालुक्यातील बोर्डा बोरकर येथील तेंदु संकलनासाठी गेलेल्या इसमावर रानगव्याने हल्ला चढवुन गंभीर जखमी केल्याची घटना कसरगट्टा बिट क्रमांक ९२ येथे घडली. यावरून जंगला लगतच्या गावातील जंगली प्राणी व मानवीजीव संघर्ष अजूनही कायम असल्याचे दिसून येते. ऋषी देवगडे वय ५० वर्षे  असे जखमीचे नाव असुन तो बोर्डा बोरकर येथील रहिवासी आहे.
ऋषी देवगडे हा सकाळी ८ वाजताच्या दरम्यान तेंदु संकलनासाठी कसरगट्टा बिट क्रमांक ९२ येथे गेला असता रानगव्याने मागुन हल्ला चढवला. हल्ला एवढा गंभीर होता कि त्यात ऋषी देवगडे हा गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ प्राथमिक आरोग्य केंद्र पोंभुर्णा येथे दाखल करण्यात आले, परंतु जखम गंभीर असल्याने त्याला पुढिल उपचारासाठी सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे. 

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top