Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: टिप्पर व दुचाकीच्या भीषण अपघातात दोन ठार ; एक जखमी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
टिप्पर व दुचाकीच्या भीषण अपघातात दोन ठार ; एक जखमी घरी लग्न कार्य असल्याने सामान खरेदीसाठी गेले होते दोघे आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स नाग...

  • टिप्पर व दुचाकीच्या भीषण अपघातात दोन ठार ; एक जखमी
  • घरी लग्न कार्य असल्याने सामान खरेदीसाठी गेले होते दोघे
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
नागभीड -
लग्ना करीता लागणारे सामान आणण्यासाठी नागभीडला जात असताना दुचाकीला टिप्परने धडक दिल्यामुळे एकाच कुटुंबातील दोन युवक ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
सूत्रानुसार घरी लग्न कार्य असल्यामुळे  सामान खरेदी करण्यासाठी चिखल परसोडी येथून दुचाकी क्रमांक एमएच 31 बीआर 1747 या वाहनाने नागभीड येथे जात असताना नागभीड कडून ब्रम्हपुरी कडे जाणारा मालवाहू टिप्पर क्रमांक एमएच 40 बीजी 5441 या वाहनाने समोरासमोर जोरदार धडक दिल्यामुळे भूषण शामराव बोकडे वय 25 वर्ष, पवन विनोद बोकडे वय 17 वर्ष हे दोन युवक जागीच ठार झाले तर गिरीश सुधाकर बोकडे वय 18 वर्ष हा गंभीर जखमी झाला असून त्याला ग्रामीण रुग्णालय नागभीड येथे प्राथमिक उपचार करून तात्काळ नागपूरला हलविण्यात आले. टिप्पर चालक गाडी सोडून चालक फरार झाला.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून शवविच्छेदन करण्याकरिता दोघांचेही शव ग्रामीण रुग्णालय नागभीड येथे पाठविले व टिप्पर चालका विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास नागभीड पोलिस करीत आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top