Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: राजुरा तालुक्यातील कुळमेथे गुड्यावरील शेतात अवैध कोळशाचा साठा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
राजुरा तालुक्यातील कुळमेथे गुड्यावरील शेतात अवैध कोळशाचा साठा  पोलिसांनी कारवाई करत 14 टन कोळसा केला जप्त आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स राज...
  • राजुरा तालुक्यातील कुळमेथे गुड्यावरील शेतात अवैध कोळशाचा साठा 
  • पोलिसांनी कारवाई करत 14 टन कोळसा केला जप्त
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
राजुरा तालुक्यातील गडचांदूर कडे जाणाऱ्या मार्गावर अनेक ठिकाणी कोळसा माफियाद्वारे कोळसा स्टाक करून इतरत्र खुल्या बाजारात विक्रीसाठी पाठविल्या जात आहे. अशाच एका कोळशाच्या साठ्यावर राजुरा पोलिसांनी काल रात्रौला धाड टाकून 14 टन कोळसा अंदाजे किंमत 56 हजार जप्त करण्यात आला आहे. 
गडचांदूर रस्त्यावरील चंदनवाही गावा शेजारील स्व.लिंगु कुळमेथे यांचे शेतात हा अवैध कोळसा आढळून आला. शेती ठेक्याने घेऊन तिथे कोळश्याचा अवैध व्यवसाय करायचा अश्यातला हा प्रकार असून, सदर कोळसा नितीन नामक व्यक्तीने साठवणूक केल्याची माहिती प्रतजमिक तपासात पोलिसांना प्राप्त झाली असून पोलिसांनी त्याचे विरुद्ध भादंवि कलम 379 नव्ये गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार सदर कोळश्याचा स्टॉक इतका होता कि पोलिसांना कोळसा उचलण्याकरिता जेसीबी आणि वाहतुकीकरिता ट्रक बोलवावा लागला. 
मागील अनेक दिवसांपासून सदर इसम या परिसरात कोळशाचा अवैध साठा करीत असल्याची कुणकुण मंगी वासीयांना लागली. स्थानिक ग्रामपंचायत चे पदाधिकारी गावात अनेक लोकोपयोगी कार्यक्रम राबवित असताना येथे सुरू करण्यात आलेला कोळसा साठा गावकऱ्यांना डोकेदुखी ठरू पाहत होता. त्यामुळे गावातील सुज्ञ नागरिकांच्या तक्रारीवरून कार्यवाही करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. सदर कारवाई एपीआय प्रशांत साखरे व संपत पुलीपाका यांनी केली.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top