Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: दोन दुचाकीची अमोरा-समोर धडक
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
दोन दुचाकीची अमोरा-समोर धडक एक मृत, दोन गंभीर जखमी धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी कोरपना - दुचाकीने दुचाकीला दिलेल्या धडकेत एक ठार...

  • दोन दुचाकीची अमोरा-समोर धडक
  • एक मृत, दोन गंभीर जखमी
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
कोरपना -
दुचाकीने दुचाकीला दिलेल्या धडकेत एक ठार तर दोघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवार दिनांक १० ला दुपारी चार वाजता च्या सुमारास कोरपना-गडचांदूर मार्गावरील माथा फाटा जवळ घडली.
वणी तालुक्यातील कळमना येथे राहणारे 34 वर्षीय पुरुषोत्तम घनश्याम मुसळे कोरपनाच्या दिशेने येत असताना गडचांदूर कडे जाणाऱ्या दुचाकीने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की पुरुषोत्तम मुसळे ह्यांचा जागीच मृत्यू झाला, तर दुसऱ्या दुचाकीवरील सोहेल शेख वय १८ व उमेश पेंदोर वय १८ रा. हातलोणी हे गंभीर जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच कोरपना पोलिसांनी धाव घेऊन पंचनामा केला व दोघांनाही कोरपना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र दोघांचीही प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले आहे. घटनेचा तपास कोरपना पोलीस करित आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top