Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: महिला पोलीस कर्मचाऱ्यावर वेडसर महिलेने लोखंडी वस्तू फेकून मारली
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
महिला पोलीस कर्मचाऱ्यावर वेडसर महिलेने लोखंडी वस्तू फेकून मारली महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर झाली दुखापत  डी.एस. ख्वाजा - आमचा विदर...

  • महिला पोलीस कर्मचाऱ्यावर वेडसर महिलेने लोखंडी वस्तू फेकून मारली
  • महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर झाली दुखापत 
डी.एस. ख्वाजा - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
चंद्रपूर शहरातील बस स्थानकाकडून प्रियदर्शनी चौकात येत असलेल्या पुलावरून खाली उतरत असताना एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला वेडसर महिलेने लोखंडी वस्तू फेकून मारली. यात महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर मोठी दुखापत झाली असून, रक्तस्त्राव झाला आहे. ही घटना 2 मे रोजी सकाळी साडे दहाच्या सुमारास घडली.
दरम्यान प्रियदर्शनी चौकात उपस्थित असलेल्या वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांनी महिला पोलीस कर्मचाऱ्यास उपचारासाठी रुग्णालयात हलविले. ज्योती कांबळे असे महिला पोलीस कर्मचारीचे नाव असून, त्या जटपुरा गेटकडे जात असताना ही घटना घडली. ही वेडसर महिला नेहमीच वाहनावरून जाणाऱ्या लोकांना वस्तू फेकून मारत असते. त्यामुळे दुर्घटना घडत आहेत. सदर वेडसर महिलेची सुरक्षित ठिकाणी रवानगी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top