Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: चंद्रपूर येथील पत्रकार प्रकाश हांडे यांना चौथास्तंभ विशेष पत्रकारिता राज्यस्तरीय पुरस्कार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
चंद्रपूर येथील पत्रकार प्रकाश हांडे यांना चौथास्तंभ विशेष पत्रकारिता राज्यस्तरीय पुरस्कार आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स चंद्रपूर - अप्रतिम ...

  • चंद्रपूर येथील पत्रकार प्रकाश हांडे यांना चौथास्तंभ विशेष पत्रकारिता राज्यस्तरीय पुरस्कार
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
चंद्रपूर -
अप्रतिम मीडिया'च्या वतीने बीट जर्नालिझमसाठी दिला जाणाऱ्या 'चौथास्तंभ' विशेष पत्रकारिता राज्यस्तरीय पुरस्कार २०२२ ची घोषणा करण्यात आली असून यात चंद्रपूर शहरातील न्यूज 34 या न्यूज पोर्टल चे संपादक प्रकाश हांडे यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. 
संपूर्ण राज्यातून विविध माध्यम प्रकारांच्या प्रतिनिधींनी नामांकन केले होते. २०२०- २०२१ या दोन वर्षांमध्ये संबंधित पत्रकाराने केलेले विशेष वृत्तांकन,  विश्लेषण व पुरस्कार निवड प्रक्रियेचा भाग म्हणून वेब संवादाद्वारे एखाद्या समस्येची केलेली मांडणी इत्यादी निकष लावण्यात आले होते. त्यानुसार राजकारण ते पर्यावरण वृत्त गटातून प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ अशा श्रेणीचे पुरस्कार घोषित करण्यात येत आहेत, अशी माहिती अप्रतिम मीडियाचे संचालक डॉ. अनिल फळे, संचालिका सौ. प्रीतम फळे, निमंत्रक राहुल शिंगवी, रणजीत कक्कड, मानस ठाकूर, जगदीश माने, निशांत फळे यांनी दिली. 
चंद्रपूर शहरातील पत्रकार प्रकाश हांडे यांना राजकीय बातमीच्या श्रेणीतून पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आले आहे. मुंबई येथे लवकरच होणाऱ्या भव्य वितरण समारंभात सन्मानित करण्यात येईल. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल चंद्रपूर शहरातील पत्रकारिता, सामाजिक, आणि राजकीय क्षेत्रातून अभिनंदन करण्यात आले

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top