Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: पीएचडी मार्गदर्शकांना पदव्युत्तर शिक्षक म्हणून मान्यता द्या
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
पीएचडी मार्गदर्शकांना पदव्युत्तर शिक्षक म्हणून मान्यता द्या गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स ची मागणी विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी र...

  • पीएचडी मार्गदर्शकांना पदव्युत्तर शिक्षक म्हणून मान्यता द्या
  • गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स ची मागणी
विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा -
गोंडवाना विद्यापीठ परिक्षेत्रातील विविध विषयातील पीएचडी मार्गदर्शकांना पदव्युत्तर शिक्षक म्हणून मान्यता द्यावी अशी मागणी गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स असोसिएशनने केली आहे.
गोंडवाना विद्यापीठाच्या परिक्षेत्रा मध्ये विविध विषयांतर्गत पदव्युत्तर अभ्यासक्रम अत्यल्प प्रमाणात असून उपरोक्त अभ्यासक्रम विनाअनुदानित तत्वावर आहे आणि पदवी स्तरावरील मान्यताप्राप्त शिक्षकांनाच पदव्युत्तर अभ्यासक्रम घ्यावे लागत असल्याने विशेष असे मान्यता पत्र त्यांना दिले जात नाही त्यामुळे  पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठीच्या मान्यताप्राप्त शिक्षकांची संख्या कमी आहे. पदव्युत्तर शिक्षक म्हणून म्हणून मान्यता मिळण्यासाठी अनेक अडचणी ना सामोरे जावे लागत आहे.
या पार्श्वभूमीवर पीएचडी मार्गदर्शकांना पदव्युत्तर शिक्षक म्हणून मान्यता दिल्यास विविध समित्या व प्राधिकारणावर शिक्षकांचा सहभाग घेता येईल आणि विविध पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विकासाला चालना प्राप्त होईल अशी भूमिका संघटनेने आपल्या निवेदनातून विशद केली आहे.
या पार्श्वभूमीवर गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स असोसिएशन पीएचडी मार्गदर्शकांना पदव्युत्तर शिक्षक म्हणून मान्यता द्यावी अशी मागणी केली असून विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे यासंबंधीचे निवेदन दिले आहे यावेळी गोंडवाना विध्यापिठ यंग टीचर्स चे सचिव डॉ.विवेक गोरलावार, उपाध्यक्ष डॉ.नंदाजी सातपुते, सहसचिव  डॉ.प्रमोद बोधाने, सहसचिव डॉ.राजू किरमिरे, डॉ.विठ्ठल ठावरी, डॉ.कैलास भांडारकर, प्रा.अजय निंबाळकर इत्यादी संघटनेचे पदाधिकारी व सदस्य यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top