Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: इंटकने कामगारांना न्याय मिळवून दिला - आर. आर.यादव
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
इंटकने कामगारांना न्याय मिळवून दिला - आर.आर.यादव इंटकचा 75वा स्थापना दिवस साजरा आमचा विदर्भ - कार्यालय प्रतिनिधी राजुरा - कामगारांना न्याय म...

  • इंटकने कामगारांना न्याय मिळवून दिला - आर.आर.यादव
  • इंटकचा 75वा स्थापना दिवस साजरा
आमचा विदर्भ - कार्यालय प्रतिनिधी
राजुरा -
कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस (इंटूक) या कामगार संघटनेने कामगारांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी अहर्निश संघर्ष केला. त्यामुळे कामगारांना त्यांचे हक्क प्राप्त होऊ शकले. आता संघटनेत पुन्हा पूर्वीप्रमाणेच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गतवैभव मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे मत येथील इंटक चे नेते आर. आर. यादव यांनी व्यक्त केले. इंटक कामगार संघटनेच्या स्थापनेला 75 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सास्ती ओपन कास्ट कोळसा खाणीत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
सध्याची संघटीत कामगारांची परिस्थिती सरकारने कामगार कायदे बदल करण्याचा प्रयत्न केल्यापासून फारशी चांगली नाही. कामगारांसाठी असलेल्या अनेक चांगल्या तरतुदींना ते मुकणार आहेत. इंटक ने कामगारांच्या हक्कासाठी अनेकदा संघर्ष केला, असे यावेळी बोलतांना सांगितले. यावेळी आयटकचे क्षेत्रीय सचिव दिलीप कनकुलवार, बीएमएसचे क्षेत्रीय कल्याण समिती सदस्य विवेक अल्लेवार, एचएमएसचे क्षेत्रीय कल्याण समिती सदस्यरंगराव कुळसंगे यांनी आपले विचार व्यक्त केले. संचालन इंटकचे कल्याण समिती सदस्य विजय कानकाटे व आभार क्षेत्रीय कोषाध्यक्ष नागेश मेदर यांनी मानले. यावेळी कार्याध्यक्ष सुदर्शन डोहे, अनंत एकडे, पंकज जुलमे, देवेंद्र कोलेरी, रवींद्र कावळे यांचेसह कोळसा कामगार उपस्थित होते.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top