Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: इंदिनगर चंद्रपूर येथे भाजयुमोच्या युवा वोरियर्स शाखेचे उदघाटन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
युवाशक्ती मजबूत लोकशाहीचा आधार शिवानी दाणी यांचे प्रतिपादन शेवटच्या माणसाची सेवेचा संकल्प करा - विशाल निंबाळकर इंदिनगर चंद्रपूर येथे भाजयुमो...

  • युवाशक्ती मजबूत लोकशाहीचा आधार शिवानी दाणी यांचे प्रतिपादन
  • शेवटच्या माणसाची सेवेचा संकल्प करा - विशाल निंबाळकर
  • इंदिनगर चंद्रपूर येथे भाजयुमोच्या युवा वोरियर्स शाखेचे उदघाटन
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
भारत विश्वगुरू व्हावा या संकल्पनेतून भाजपाची वाटचाल सुरू आहे. या प्रक्रियेत युवापिढीची महत्वाची भूमिका राहणार आहे. ही भूमिका युवकांनी समजून घ्यावी. ही युवाशक्ती मजबूत लोकशाहीचा आधार आहे,असे प्रतिपादन भाजयुमो प्रदेश महामंत्री शिवानी दाणी यांनी केले. त्या गुरुवार 28 एप्रिलला भारतीय जनता युवा मोर्चा, बंगाली कॅम्प मंडळ मधील इंदिरा नगर युवा वॉरियर्स शाखेचं उद्घाटन करतांना बोलत होत्या.
लोकनेते सुधीर मुनगंटीवार व माजी केंद्रीयमंत्री हंसराज अहिर यांच्या मार्गदर्शनात झालेल्या या कार्यक्रमात युवा वॉरियर्स विदर्भ संयोजक देवदत्त डेहनकर, भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे, प्रदेश उपाध्यक्ष रघुवीर अहिर, प्रदेश सचिव अंकुश ठाकूर, जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर, भाजपा महामंत्री महानगर ब्रिजभूषण पाझारे, भाजयुमो महामंत्री प्रज्वलंत कडू, सुनील डोंगरे, प्रमोद क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी शेवटच्या माणसाची सेवेचा संकल्प करा, युवा म्हणजे वायू, त्याची दिशा योग्य व वेग नियंत्रित असेल तर क्रांती होते. स्वतःवर नियंत्रण ठेवून युवकांनी लक्ष्य गाठले पाहिजे. हे करतांना शेवटच्या माणसाच्या सेवेचा संकल्प करा, असे आवाहन भाजयुमो जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर यांनी केले.
कार्यक्रमाचे नेतृत्व बंगाली कॅम्प युवा मोर्चा अध्‍यक्ष संजय पटले व युवा वारियर्स मंडळ संयोजक यश बांगडे यांनी केले. यावेळी नगरसेविका चंद्रकलाताई सोयाम, वंदनाताई जांभुळकर, मंडळ अध्यक्ष दिनकर सोमलकर, भाजयुमो महानगर उपाध्यक्ष पप्पू बोपचे, मनोज पोतराजे, आकाश म्हस्के य

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top