- फूटपाथ व्यवसायिकांना 'कुल जार'चे वाटप
- महाराष्ट्र व कामगार दिनी आ.मुनगंटीवार यांच्या पुढाकारने कुलजार वाटपाचे तिसरे वर्ष
- भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे व महामंत्री राजेंद्र गांधी, रवींद्र गुरनुले, कोषाध्यक्ष प्रकाश धारणे, भाजयुमो अध्यक्ष विशाल निंबाळकर यांची उपस्थिती
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
विधिमंडळ लोकलेखा समिती आध्यक्ष आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून महानगरातील गिरनार चौक ते गांधी चौक व गांधी चौक ते पाठणपुरा व जटपूरा गेट परिसरातील फुटपाथ व्यवसायिकांना महाराष्ट्र दिन व कामगार दिवसाचे औचित्य साधून रविवार 1 मे ला 'कुलजार' वाटप करण्यात आले. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष(श) डॉ. मंगेश गुलवाडे, संघटन महामंत्री राजेंद्र गांधी, कोषाध्यक्ष प्रकाश धारणे, महासचिव रवींद्र गुरनुले, भाजयुमो जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर, भाजपा नेते सचिन कोतपल्लीवार, राजेंद्र खांडेकर, रवी चहारे, गणेश रामगुंडेवार, राहुल पाल, अमित निरंजने, राकेश बोमनवार, रामकुमार आक्केपल्लीवार, अरविंद कोलंनकर, रोशन माणुसमारे, विक्की मेश्राम, मोहन मंचलवार, मनीष खापरे, नकुल आचार्य, श्रेयस घरोटे, श्याम बोबडे यांची उपस्थिती होती. प्रारंभी, डॉ गुलवाडे, धारणे व गांधी यांचे हस्ते गिरनार चौक व गांधी चौक येथे फूटपाथ व्यवसायिकांना कुलजार वितरित करण्यात आल्यावर पठाणपूरा गेट कडील शेकडो फूटपाथ व्यवसायिकांना ही जार चे वितरण करण्यात आले.
यावेळी डॉ गुलवाडे म्हणाले, आ सुधीरभाऊ यांच्याकडे पुढाकारातून हे जार देण्यात येत आहे. कोरोनाचे 2 वर्ष सोडून कुलजार वाटपाचे हे तिसरे वर्ष आहे. रखरखत्या उन्हाळ्यात हे जार फुटपाथ व्यवसायिकांसाठी वरदान ठरणार आहे, उन्हात काम करतांना उपाशी राहू नका, भरपूर पाणी पिण्याचा सल्ला यावेळी डॉ गुलवाडे यांनी यावेळी दिला. कुल जार लाभार्थ्यांमध्ये चंद्रपुर महानगरातील हातगाडी चालक, फुटपाथ वरील लहान व्यवसायिक, चर्मकार, फळ व भाजी विक्रेते यांचा समावेश होता.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.