Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: कार्यकर्त्यांनी जनसेवेची गुडी उंच उभारून क्षेत्रात काँग्रेसमय वातावरण निर्माण करावे - आमदार सुभाष धोटे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
कार्यकर्त्यांनी जनसेवेची गुडी उंच उभारून क्षेत्रात काँग्रेसमय वातावरण निर्माण करावे - आमदार सुभाष धोटे रामपूर येथील शेकडो कार्यकर्त्यांचे का...

  • कार्यकर्त्यांनी जनसेवेची गुडी उंच उभारून क्षेत्रात काँग्रेसमय वातावरण निर्माण करावे - आमदार सुभाष धोटे
  • रामपूर येथील शेकडो कार्यकर्त्यांचे काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
  • आमदार सुभाष धोटे यांच्या उपास्थित कार्यकर्त्यांचा जल्लोष
विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा -
लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन काँग्रेस पक्षाच्या विकासवादी आणि सकारात्मक विचारधारेचा पुरस्कार करीत राजुरा तालुक्यातील मौजा रामपूर येथील शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेस मध्ये पक्षप्रवेश केला. आमदार सुभाष धोटे यांनी सर्वांना काँग्रेस पक्षाचे दुप्पटे देवून त्यांचे काँगेस पक्षात स्वागत केले तसेच लोकाभिमुख जनसेवा करण्यासाठी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी तय्यार रहावे व कार्यकर्त्यांनी जनसेवेची गुडी उंच उभारून क्षेत्रात काँग्रेसमय वातावरण निर्माण करावे तसेच सध्या संपूर्ण राज्यात काँग्रेसचे डिजिटल सदस्य नोंदणी अभियान अतिशय उत्तमपणे सुरू असून आपल्या क्षेत्रात व्यापक प्रमाणात सदस्य नोंदणी करण्यासाठी सर्वानी परिश्रम घ्यावेत असे आवाहन उपस्थित सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना केले. 
या प्रसंगी रामपूर येथील प्रमोद हजारे, भाऊराव रोगे, शामराव चन्ने, मारोती ननावरे, सीताराम बोडे, विठल बोडेकर, मधूकर रोगे, बंडु थिपे, मधुकर मालेकर, नत्थु जी कावडे, साईनाथ वांढरे, अनिल वांढरे, पद्माकर उरकुडे, आकाश चिंचोलकर, प्रभाकर गोरे, रामचंद्र बोबडे,निलेश माणूसमारे, निवलकर, गितेश  कोवराशे, अनुम लांडे, नितिन रोगे, जयप्रकाश रोगे, राहूल रोगे, हनुमान मालेकर, मंगेश बोडे, विक्रोष चिंचोलकर, हरीचंद्र वांढरे, सूनिल वांढरे, रुखमणी वांढरे, मधुरी वांढरे, तुरणकर ताई, संगीता थीपे, सुनंदा ननावरे, सरिता लांडे, छायाताई बोढे, कलाताई चने, गेडाम मॅडम, सिंधुताई रोगे, संगीता हजारे, वाचला रोगे, जयश्री रोगे यासह शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.
या प्रसंगी काँगेसचे नेते तथा माजी नगराध्यक्ष अरूण धोटे, शहराध्यक्ष संतोष गतलेवार, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष शेंडे, रामपूर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रभाकर बघेल, ग्रा. प. सदस्य जगदीश बुटले, कोमल फुसाटे, पंढरी चन्ने, रवी लोहे, ऐखनाथ खडसे, बुरांडे सर, शेंडे सर, युएके सर, यादव लांडे, दिलीप ईटनकार, ईश्वर दूपारे, सतीश चोधरी, काकडे ताई, यूएके ताई , खंडाळे ताई, गेडाम जी यासह रामपूरचे असंख्य नागरिक उपस्थित होते.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top