शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
थोर समाज सुधारक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंती निमित्त आजाद बाग येथे आयोजित कार्यक्रमात आमदार किशोर जोरगवार यांनी महात्मा ज्योतीबा फुले यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करुन अभिवादन केले. यावेळी माजी केंद्रिय गृहराज्य मंत्री हंसराज अहिर, नगर सेवक नंदु नागरकर, विजय राऊत, कुणाल चहारे, सुर्या अडबाले, डि. के आरिकर यांच्या सह सर्व पक्षीय पदाधिका-र्यांची उपस्थिती होती.
महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंती निमित्त आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान आजाद बागेत आयोजित अभिवादन कार्यक्रमात आमदार किशोर जोरगेवार यांनी उपस्थित राहत क्रांतीसुर्य ज्योतीबा फुले यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करित अभिवादन केले.
थोर क्रांतिकारी विचारवंत ज्योतिबा फुले यांनी महाराष्ट्रात सुधारणेची पुरोगामी परंपरा सुरू केली. वर्तमानात आपल्या सभोवताली समाजात आढळणार्या उणिवा, दोष, त्रुटी पाहून भविष्यात त्यावर मात करण्यासाठी मार्ग शोधून अनिष्ट रूढी-परंपरांविरुद्ध आयुष्यभर ते झगडत राहिले, त्यासाठी त्यांनी सत्यशोधक समाज स्थापन केला. हजारो अनुयायी घडवले. विदया, सत्य आणि सत्शील यांचाच सदैव आग्रह धरत समाजाला सत्य आणि समता या तत्त्वांचा सक्रिय संदेश दिला त्यांचा हा संदेश अंगिकारण्याची गरज असल्याची भावणा आदरांजली कार्यक्रमा प्रसंगी आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केली
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.