Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या शुन्यावर
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या शुन्यावर ॲक्टीव्ह रुग्ण 2 श्रावण कुमार - आमचा विदर्भ प्रतिनिधी चंद्रपूर - दि. 5 एप्रिल: जिल्ह्यात एकही कोर...

  • जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या शुन्यावर
  • ॲक्टीव्ह रुग्ण 2
श्रावण कुमार - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
दि. 5 एप्रिल: जिल्ह्यात एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला नाही. तर जिल्ह्यात एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 98 हजार 960 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 97 हजार 391 झाली आहे. सध्या 2 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 8 लाख 95 हजार 304 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 7 लाख 95 हजार 279 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1567 बाधितांचे मृत्यू झाले आहे.
प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top