Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: भगवान झुलेलाल जयंती निमित्य काढण्यात आलेल्या शोभयात्रेचे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने स्वागत
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
भगवान  झुलेलाल जयंती निमित्य काढण्यात आलेल्या शोभयात्रेचे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने स्वागत शोभायात्रेत सहभागी झालेल्यांसाठी यंग चांदा ब्रि...

  • भगवान  झुलेलाल जयंती निमित्य काढण्यात आलेल्या शोभयात्रेचे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने स्वागत
  • शोभायात्रेत सहभागी झालेल्यांसाठी यंग चांदा ब्रिग्रेडने केली शितपेयाची व्यवस्था
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर- 
भगवान झुलेलाल जयंती निमित्य सिंधी समाज बांधवांच्या वतीने शहरात काढण्यात आलेल्या शोभायात्रेचे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी शोभायात्रेत सहभागी झालेल्या सिंधी समाज बांधवांसाठी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने शितपेयाची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे शहराध्यक्ष पंकज गुप्ता, प्रसिध्दी प्रमूख नकुल वासमवार, चंद्रशेखर देशमुख, शहर संघटक रुपेश पांडे, विलास वनकर, हेरमन जोसेफ, आनंद रणशूर आदिंची उपस्थिती होती.
सिंधी समाजाचे आराध्य दैवात भगवान झुलेलाल साई यांच्या जयंती निमित्य दरवर्षी प्रमाणे यंदाही सिंधी समाज बांधवांच्या वतीने शहरातुन भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती. दरम्याण कसतुरबा मार्गावर यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने या शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले. यावेळी शोभायात्रेत सहभागी भगवान झुलेलाल साई यांच्या प्रतिमेचे दर्शन घेत पूष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रंगी शोभायात्रेत सहभागी सिंधी समाज बांधवांसाठी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने शितपेयाची व्यवस्था करण्यात आली होती. सदर शोभायात्रेत सिंधी समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top