Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: नरभक्षक बिबटयाला तातडीने जेरबंद करावे – आ. सुधीर मुनगंटीवार यांची मागणी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
नरभक्षक बिबटयाला तातडीने जेरबंद करावे – आ. सुधीर मुनगंटीवार यांची मागणी शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी चंद्रपूर - दुर्गापूर परिसरातील नरभ...

  • नरभक्षक बिबटयाला तातडीने जेरबंद करावे – आ. सुधीर मुनगंटीवार यांची मागणी
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
दुर्गापूर परिसरातील नरभक्षक बिबटयाला त्‍वरीत जेरबंद करावे व अशा घटनांची पुनरावृत्‍ती होवू नये यादृष्‍टीने तातडीने उपाययोजना करण्‍याची मागणी विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.
काल दुर्गापूर परिसरात नरभक्षक बिबटयाने एका मुलाला ठार केल्‍याची घटना घडली. शहराच्‍या हद्दीत वन्‍यप्राण्‍यांनी येवून नागरिकांना ठार करणे व त्‍या माध्‍यमातुन मानव वन्‍यजीव संघर्ष निर्माण होणे ही अतिशय गंभीर व चिंतेची बाब आहे. यासंदर्भात सिसीटिव्‍ही सर्व्‍हेलन्‍स सिस्‍टीमचा उपयोग करणे अत्‍यंत गरजेचे आहे. त्‍याचप्रमाणे मध्‍यप्रदेश पॅटर्ननुसार सायरन प्रणालीचा वापर करण्‍याची आवश्‍यकता आहे.जंगली जनावर जर गावाकडे येत असेल तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स च्या माध्यमातून सायरन प्रणाली विकसित करावी. वाघ व बिबट यांच्‍या हल्‍ल्‍यात निरपराध नागरिकांचे बळी जाण्‍याच्‍या घटना सातत्‍याने घडत आहेत. त्‍यामुळे या घटनांवर प्रतिबंध घालण्‍याच्‍या दृष्‍टीने तसेच मानव वन्यजीव संघर्ष वाढू नये यादृष्टीने तातडीची उपाययोजना करण्‍याची आवश्‍यकता आहे, तसेच सरकारने उच्चस्तरीय बैठक आयोजित करून कार्यवाही करण्याची आवश्यकता आहे. असेही आ. सुधीर मुनगंटीवार यांनी म्‍हटले आहे. या नरभक्षक बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करावा अन्यथा भारतीय जनता पार्टी आंदोलन छेडेल असा इशारा आ. मुनगंटीवार यांनी दिला.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top