Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: नारंडा येथे इयत्ता दहावीचा विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ साजरा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
नारंडा येथे इयत्ता दहावीचा विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ साजरा सामान्य ज्ञान व निबंध स्पर्धा चे बक्षीस वितरण संपन्न धनराजसिंह शेखावत - आमचा व...

  • नारंडा येथे इयत्ता दहावीचा विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ साजरा
  • सामान्य ज्ञान व निबंध स्पर्धा चे बक्षीस वितरण संपन्न
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
कोरपना -
तालुक्यातील आदर्श किसान विद्यालय  नारंडा येथे निरोप समारंभ साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक गुरूमुखी सर, भिमनवार सर, गोरे सर, मोडकवार सर, फुलझेले सर, खामकर सर, धुमाने सर, निवलकर मॅडम, वाभिटकर सर आणि अरुण निरे उपस्थित होते. उपस्थित सर्व शिक्षकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. सर्व शिक्षक आणि 10 वी च्या विद्यार्थ्यांयांनी मीनल जुमनाके, मानसी गाडगे, आकांशा झाडे, दिव्या वांढरे, कुणाल मोहूर्ले, समीक्षा बोरुले, अंकिता ताजने आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन मनस्वी कोडापेनी केले.  आयोजित सामान्य ज्ञान व निबंध स्पर्धा मध्ये प्रथम क्रमांक कुणाल मोहुर्ले, द्वितीय क्रमांक, संध्या बोरूले, तृतीय क्रमांक तनु करमानकर ने पटकावला. शरद जोगी यांच्या कडून प्रथम बक्षीस स्वरूपात 1000 रू. देण्यात आले, भारतीय वार्ता चैनल कडून द्वितीय बक्षीस ७०० रु. व आबिद अली साहेब यांच्याकडून तृतीया बक्षीस ५०० रू. देण्यात आले.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top