Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: शुभम बोर्डेवार नेट परीक्षा उत्तीर्ण
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शुभम बोर्डेवार नेट परीक्षा उत्तीर्ण विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी राजुरा - राष्ट्रीय परीक्षा एजन्सी तर्फे घेण्यात आलेल्या यूजीसी न...

  • शुभम बोर्डेवार नेट परीक्षा उत्तीर्ण
विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा -
राष्ट्रीय परीक्षा एजन्सी तर्फे घेण्यात आलेल्या यूजीसी नेट परीक्षेचा निकाल आज घोषित झाला असून शिवाजी महाविद्यालय राजुरा येथे कार्यरत प्रा.बी.यू.बोर्डेवार यांचा मुलगा शुभम बोर्डेवार कॉमर्स विभागातून नेट परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. जानेवारी 2022 मध्ये शुभम बोर्डेवार यांनी सेट परीक्षा उत्तीर्ण केली होती. एकाच वर्षी दोन्ही परीक्षा उत्तीर्ण होण्याचा मान प्राप्त झाला आहे. गोंडवाना विद्यापीठाच्या पीएचडीच्या पीट परीक्षेत शुभम बोर्डेवार विद्यापीठातून प्रथम आला होता. त्यांच्या यशा बद्दल सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top