Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: रामपूर-गोवरी मार्गावर रास्ता रोको
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
रामपूर-गोवरी मार्गावर रास्ता रोको वेकोलि अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी येऊन शिवसैनिकांना दिले आश्वासन  सात दिवसात मागण्या पूर्ण न झाल्यास वेकोली ...

  • रामपूर-गोवरी मार्गावर रास्ता रोको
  • वेकोलि अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी येऊन शिवसैनिकांना दिले आश्वासन 
  • सात दिवसात मागण्या पूर्ण न झाल्यास वेकोली कार्यालयासमोर करणार बेमुदत आंदोलन - बबन उरकुडे
  • बबन उरकुडे यांनी वेकोलि अधिकाऱ्यांना घेतले धारेवर - बघा व्हिडीओ 
अनंता गोखरे - आमचा विदर्भ
राजुरा -
रामपूर-गोवरी-पोवणी रस्त्यावरील जड वाहतूक आणि प्रदूषणासंदर्भात शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे यांच्या उपस्थितीत आणि शिवसेना नेते बबन उरकुडे यांच्या नेतृत्वात राजुरा शिवसेनेच्या वतीने मंगळवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. वेकोलिमुळे निर्माण झालेल्या प्रमुख मागण्यांना घेऊन लेखी निवेदन देण्यात आले. या आंदोलनामुळे रस्त्यावर दूर-दूर पर्यंत कोळसा वाहून नेणाऱ्या जड वाहनांची रांग लागली होती. दरम्यान वेकोली अधिकाऱ्याकडून आंदोलनस्थळी भेट देऊन येणाऱ्या सात दिवसात प्रमुख मागण्यांची पूर्तता करण्यात येईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. या विषयावर चर्चा करून त्याची पूर्तता सात दिवसाच्या कालावधीत करू, असे आश्वासन अधिकाऱ्यांकडून देण्यात आले. यावेळी वेकोलीचे अधिकारी जी.पुल्लया, बारला यांनी स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. या आंदोलनात राजुरा शिवसेना तालुका प्रमुख वासुदेव चापले, शिवसेना तालुका समन्वयक प्रदीप येनूरकर, शिवसेना शहर प्रमुख निलेश गंपावार, युवासेना तालुका प्रमुख बंटी मालेकर, शिवसेना उपतालुका प्रमुख रमेश झाडे, शिवसेना शहर समन्वयक बबलू चव्हाण, माजी सरपंच रामपूर उज्वल शेंडे, विभाग प्रमुख अजय साकीनाला, रमेश कुडे माजी उपसरपंच रामपूर, तिरुपती काटम, अनिल लिपटे, श्याम मुत्तुंनरी, अतुल खनके, जुटी सुरेश, प्रभाकर गुंडेट्टी, प्रफुल मादास्वार, गणेश चोथले, अक्षय लांडे, श्रावण गोरे, किरण पारखी, सुनील पाचभाई, मयूर गोहने, आशिष मालेकर, अनिकेत गिरसावडे, रुपेश गोहने, गोवरी सरपंच आशा उरकुडे, ग्रा.पं.सदस्य संगीता विधाते, लता डाखरे, माया मालेकर, वर्षा पंदीलवार, वनिता येनूरकर, कावळे, साधना गोरे, सुशीला काळे, पोटे, आमने, भोयर, निरजा मरापे, प्रतिभा टेकाम, नंदा सिडाम, मालन टेकाम, सुवर्णा बोबडे, रेखा नुलगामकर, पौर्णिमा मरोने, कमला मडावी, तुळशीराम मरापे, कल्पना आत्राम, सोनू मत्ते, रेखा मडावी, शेवंता मरापे, सुनीता सोयाम, संगीता कुळसंगे, कुसुम सिडाम, तारा कोडापे यासह कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

अशा आहेत ग्रामस्थांच्या मागण्या
रामपुर-गोवरी-पोवणी या रस्त्यावरून 22 ते 25 टन क्षमता असलेल्या ट्रक मध्ये 60 ते 65 टनची जड वाहतूक होत असून ती त्वरित थांबवण्यात यावी, वाहतुकीमुळे प्रदूषण वाढले असून त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होत असून त्यासाठी रोज रस्त्यावर पाणी टँकर चालवण्यात यावे, या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, भडांगपूर येथून स्थलांतरित रामपूर येथील कुटुंबाना त्यांच्या जमिनीची पट्टे त्वरित देण्यात यावे, गोवरी पोवणी एक्सपान्शन संदर्भात त्वरित कार्यवाही करण्यात यावी, बल्लारपूर एरियात पाच कंत्राटी कंपनीचे काम चालू असून तेथे स्थानिकांना रोजगार देण्यात यावा यासह अनेक समस्यासाठी आंदोलन करण्यात आले.
...अन्यथा पुन्हा आंदोलन करणार
या बेमुदत आंदोलनाला वेकोलिच्या आश्वासनानुसार स्थगिती दिली असून मागण्या पूर्ण न झाल्यास वेकोली कार्यालयासमोर आंदोलन करू, असा इशारा शिवसेना पदाधिकारी व ग्रामस्थांनी दिला आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top