- मुमताज जावेद यांचे हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर बाल वाचनालयाचे उद्घाटन
- जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बैलमपूरचा अभिनव उपक्रम
विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा -
या मोबाईलच्या काळात मुलांच्या हाती काही नवे विषय वाचायला दिले तर त्यांचा वेळ चांगला जाईल. तसेच वाचनसंस्कृतीही वाढीस लागेल, या हेतूने जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बैलमपूर ने अभिनव उपक्रम राबवत डॉ. बाबासाहेब आंबेडकर बाल वाचनालयाची सुरुवात केली. मुलांना आवडतील अशी पुस्तके वाचनालयात जमा केली गेली. या बाल वाचनालयाचे उद्घाटन पंस सभापती सौ. मुमताज जावेद यांचे हस्ते झाले.
आपल्यापैकी अनेकांचं बालपण हे आई-वडील, आजी-आजोबा किंवा शिक्षक अशा मंडळींनी सांगितलेल्या कथा-कहाण्यांनी समृद्ध झालय! गोष्टींतून लहानग्यांना होत जाणारी भाषेची ओळख, पुढे स्वत:च पुस्तक वाचून समृद्ध होणारी त्यांची भाषा आणि इतर आनुषंगिक कौशल्ये असं सर्व एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे सुपूर्द होत असे. पण आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत मुलांना गोष्टी सांगायला वेळ नाही. तर ग्रामीण आदिवासी भागात तशी जाणीवच फारशी आता राहिली नाही. खेड़ेगावात वाचनाचे स्त्रोत खुप कमी आहेत मात्र शाळेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर बाल वाचनालय सुरु करून विद्या प्राप्त करण्याची कवाडे खोलली आहे असे प्रतिपादन उद्घाटन प्रसंगी पंस सभापती सौ. मुमताज जावेद यांनी केले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पंस संवर्ग विकास अधिकारी किरण धनवाडे, पंस सदस्या सौ. कुंदाताई जेणेकर, पंस सदस्या सौ. नैना परचाके, पंस सदस्य तुकाराम माणूसमारे, गट शिक्षणाधिकारी मनोज गौरकार, देवाडा ग्राम पंचायतचे उपसरपंच जावेद मज्जीद अब्दूल, शिक्षण विस्तार अधिकारी विजय परचाके, हेडाऊ, मानोली केंद्र प्रमुख देवाळकर, जामणी ग्रापं सचिव उपासे, चांदेकर पाटील, भारत मेश्राम, गुलाब मुरमाडे, शंकर परचाके, अशोक चांदेकर, रेखाताई कोडापे, अरविंद दुर्गे, शाळेचे मुख्याध्यापक अ.मा. खामनकर, पवार सर, जिबकाटे मॅडम इत्यादी उपस्थित होते.
पाहुण्यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेच पुजन करून कार्यक्रमाचे उदघाट्न करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांच्या जीवनात वाचनालयाचे महत्व सांगण्यात आले. प्रास्ताविक शिक्षिका सुवर्णा शिंदे तर आभार विनोद चव्हाण यांनी मानले.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.