Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: बंद पडलेल्या स्ट्रीटलाइट पुन्हा सुरू करण्याचे काम वेगाने सुरु
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
बंद पडलेल्या स्ट्रीटलाइट पुन्हा सुरू करण्याचे काम वेगाने सुरु भाजयुमो तालुकाध्यक्ष रोहन काकडे यांच्या मागणीला यश धनराजसिंह शेखावत - आमचा विद...

  • बंद पडलेल्या स्ट्रीटलाइट पुन्हा सुरू करण्याचे काम वेगाने सुरु
  • भाजयुमो तालुकाध्यक्ष रोहन काकडे यांच्या मागणीला यश
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
गडचांदूर शहराच्या सर्वांगीण विकास व शोभेकरिता शहरातील मुख्य मार्गावरील दुभाजकावर नगर परिषदेच्या माध्यमातून नगर परिषदेच्या माध्यमातून स्ट्रीट लाईट लावण्यात आले होते. निश्चितच यामुळे शहराच्या शोभेत भर पडल्याचे पहावयास मिळत होते, परंतु कालांतराने त्याच्या देखभाल व दुरुस्ती कडे नगरपरिषदेने दुर्लक्ष केल्याचे चित्र समोर आले व त्यातील बरेच स्ट्रीट लाईट बंद असल्याचे पाहावयास मिळत होते. करिता भाजयुमो तालुका अध्यक्ष रोहन काकडे यांनी मुख्याधिकारी नगरपरिषद गडचांदूर यांना निवेदन देऊन तात्काळ स्ट्रीट लाइट सुरू करून शहराला गतवैभव प्राप्त करून देण्याबाबत अवगत केले.  मुख्य अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेऊन सदर बंद स्ट्रीटलाइट पुन्हा सुरू करण्याच्या कामाला गती दिली. त्याबद्दल त्यांनी मुख्याधिकारी चे आभार मानले व त्याप्रमाणे मार्गावरील दुरगाव या वाहनावरील प्रश्न लवकरच मार्गी लागेल अशी आशा व्यक्त केली.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top