- ब्रेकिंग न्युज
- माता तू न वैरिणी, अनोळखी महिलेचे प्रेत ते खुन ; गुन्हा उलगडा
- अज्ञात अनोळखी महिलेचे प्रेत आढळले होते विहिरीत
- तीन आरोपीना तेलंगानातून अटक ; दोन महिला आरोपी
- फिर्यादीच निघाले आरोपी
- वाचा सविस्तर... विरूर पोलिसांनी कसा लावला खूनाचा छडा
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
विरूर स्टेशन (राजुरा) -
दिनांक 18 फेब्रुवारी 2022 चे दुपारी 3 वाजताच्या दरम्यान कविठपेठ शिवारातील अर्जुन आत्राम यांचे शेतातील विहीरीत एका अनोळखी महिलेचे प्रेत तरंगत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलीस घटनास्थळी दाखल होवून महीलेचे प्रेत बाहेर काढले, सदर महिलेची ओळख पटत नव्हती. पोलिसांनी त्या महिलेची ओळख पटविण्यासाठी वर्तमान पत्रे, डिजिटल मीडिया, फेसबुक, वाट्सअपचा अश्या सोशल मीडियाच्या माध्यमांचा वापर केला. महिलेच्या बांध्यावरून ती तेलंगणा किंवा आंध्रप्रेदशातील असावी असे वाटत होते. त्यामुळे त्याठिकाणी सुध्दा माहिती पोहचविण्यात आली. पोलीस पथक बनवून परिसरातील लोकांना फोटो दाखवून ओळख पटविण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतू ओळख पटत नव्हती. मात्र यातच सदर महिला कोंडापल्ली, विजयवाडा, आंध्रप्रदेश येथील सैदा बदावत असल्याचा सुगावा लागला. पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारावर मृत महिलेचा आईचा मोबाईल क्रमांक मिळून तिचेसोबत संपर्क केला. व मृतक महिलेची ओळख पटविली. मृत महिलेच्या आईला विरूर येथे बोलावून मृत महिलेचे शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदन अहवालात सदर मृत महिला गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले परंतू तिच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झाले नाही.
परराज्यातील महिला विरुर हद्दीत येवून निर्जन स्थळावरील विहीरीत कशी पडली याबाबत पोलिसांना शासंकता होती. या परिसरात मृत महिलेचा सिन्नू अजमेरा रा. मुंडीगेट हा नातेवाईक असल्याची माहीती मिळाली. सिन्नुसोबत संपर्क केला असता तो हैद्राबादला असल्याचे सांगीतले तसेच तो उडवाउडवीचे उत्तर देत होता. सिन्नुवर शंका आल्याने पोलिसांनी त्याचे मोबाईल क्रमांकाचे कॉल डिटेल्स घेतले असता असे समोर आले की सिन्नू हा घटनेच्यावेळी मुंडीगेट येथे येवून गेला होता. संशयीत इसम सिन्नूवर संशय बळावल्याने त्याला हैद्राबाद येथून आणण्याकरीता एक टिम पाठविली. सदर महिलेच्या मृत्यूबाबत शंका असल्याने तिच्या आईच्या तक्रारीवरून 302, 201 भादवीचा गुन्हा दाखल करून तपासात घेतला.
सिन्नू अजमेरा रा. मुंडीगेट याला हैद्राबाद येथून आणून त्याला विचारपुस केली असता त्याने आपला गुन्हा कबूल केला व सांगीतले की, मृतक सैदा बदावत वय 30 वर्ष रा. कोंडापल्ली हिचे दहा वर्षापुर्वी कोंडापल्ली येथील एका इसमासोबत लग्न झाले होते. तिला एक 9 वर्षाची मुलगी आहे परंतू तिने पतीला सोडुन दिले, नंतर ती कोणत्याही इसमासोबत निघून जात होती, कोणत्याही परपुरूषाला घरी घेवून येत होती. तिच्यामुळे तिची आई लचमी बदावत हिला बदनामी सहन करावी लागत होती. तिच्या अशा वागण्यामुळे सैदा बदावतला तिचे वडील नेहमी रागवायचे त्यामुळे सयदा ने त्याच्या वडिलाला झोपेच्या गोळ्या देवून मारले अशी तिच्या आईला शंका होती. यामुळे सैदाच्या आईला सैदाचा संताप आला होता. तसेच सैदा 4 ते 5 महिण्याची गर्भवती असल्याचे समजले, पोटातील बाळ कोणाचे आहे याबाबत सैदाला सुध्दा माहित नव्हते. आपली समाजात बदनामी होईल याकरीता सैदाच्या आईने ते सैदाला मारून टाकण्याचा विचार केला. दि. 14 फेब्रुवारी 22 रोजी सैदा व तिची आई एका लग्न कार्यक्रमात गणा येथे आले होते. त्याठिकाणी सिन्नू व त्याची पत्नी शारदा हे सुध्दा आले असल्याने त्यांची तिथे भेट झाली. तिथे सैदाच्या आईने सिन्नू व शारदाला सैदाला तुमच्या परीसरात नेवून मारून टाकून पुरावा नष्ट करा या करिता 30 हजार रुपयाची सुपारी दिली होती. त्यातील 5,000 रुपये नगदी दिले. दोन-तिन दिवस तिथे राहून शरदाने सैदाला तुझे बाळ पाडून टाकण्याकरीता आमचे गावी औषधी देतात असे सांगून तिला घेवून रेल्वेने सिन्नुसह मुंडीगेट येथे दि. 17 फेब्रुवारी 22 ला दुपारी 3 वाजता आणण्यात आले. त्यादिवशी जेवण करून ते झोपले. दि. 18 फेब्रुवारी 2022 सकाळी सातच्या दरम्यान सिन्नुने मित्राची मोटारसायकल आणली व पोटातील बाळ पाडण्याचे औषधी घेण्याकरीता सैदा व पत्नी शारदा यांना घेऊन तिघेही जंगलालगत असलेल्या कविठपेठ शिवारातील निर्जनस्थळी अर्जून आत्राम याचे शेतात गेले. याचठिकाणी तुला औषधी देणार आहे असे सांगून विहिरीजवळ घेवून गेले. तेथे बालटीने सैदाला विहीरीतून पाणी काढ असे सांगीतले ती पाणी काढण्याकरिता खाली वाकली त्याचवेळी शारदा ने मागून जोराने धक्का दिला. त्यामुळे सैदा विहिरीत पडली. ती मरेल की नाही ही भीती होती त्यामुळे तेथील मोठा दगड उचलून वरून टाकले परंतू तो दगड बाजूला पडला. तेवढ्यात सैदा पाण्यात बुडाल्याने मरण पावली. तेथून सिन्नूने त्याचे पत्नीला घरी सोडले व हैद्राबादला निघून गेले.
सदर तपासात आरोपी सिन्नू नरसिम्हा अजमेरा वय 35 वर्ष, सौ. शारदा सिन्नू अजमेरा वय 26 वर्ष दोन्ही राहणार मुंडीगेट, ता. राजूरा व लचमी भिमा बदावत वय 50 वर्ष रा. कोंडापल्ली, विजयवाडा, आंध्रप्रदेश यांना अटक करण्यात आली. तसेच गुन्ह्यातील महत्वपूर्ण पुरावे गोळा करण्यात आले. सदर गुन्ह्यात फिर्यादी हिच आरोपी निघाली आहे. कोणताही प्रकारची माहिती नसतांना सदर गुन्हा उघडीस आणला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी राजा पवार यांचे मार्गदर्शनात विरूर पोलीस स्टेशनचे सपोनि राहूल चव्हाण, पो.हवा. माणिक वाग्दरकर, पो.हवा. दिवाकर पवार, ना.पोशि. नरगेवार, विजय मुंडे, सविता गोनेलवार, पोशि. सुरेंद्र काळे, भगवान मुंडे, अशोक मडावी, प्रमोद मिलमिले, अतुल सहारे, लक्ष्मीकांत खंडाळे, ममता गेडाम यांनी पार पाडली.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.