Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: सुनीता उरकुडे रामपूर ग्राम पंचायतीच्या उपसरपंचपदी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
सुनीता उरकुडे रामपूर ग्राम पंचायतीच्या उपसरपंचपदी आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स राजुरा - शहरालगत तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून...

  • सुनीता उरकुडे रामपूर ग्राम पंचायतीच्या उपसरपंचपदी
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
शहरालगत तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जात असलेल्या रामपूर येथे उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीत आघाडीच्या सुनीता मधुकर उरकुडे यांचा एक मताने विजय झाला आहे.
रामपूर ग्रामपंचायतीच्या माजी उपसरपंच हेमलताताई ताकसांडे यांनी अगोदर ठरविल्याप्रमाणे अडीच वर्षे कालावधी पूर्ण झाल्याने उपसरपंच पदाचा राजीनामा दिला. या रिक्त जागेवर आज दि. १४ उपसरपंच पदासाठी मतदान घेण्यात आले यावेळी काँग्रेस-शिवसेना यांचेकडून अनिता आडे यांनी आवेदनपत्र सादर केले तर, शेतकरी संघटना-भाजपा-राकांपा कडून सुनीता मधुकर उरकुडे यांनी आवेदनपत्र सादर केले. मतदान करताना एक मत आंगठाने दिल्याने ते मत अवैध ठरविण्यात आले. दोन्ही उमेदवारांना ५-५ समान मते मिळाली असता सरपंच वंदनाताई गौरकार यांनी निर्णायक मतदान केल्यामुळे सुनीता उरकुडे या एक मंतांनी विजयी झाल्या. यावेळी मतदानात सरपंच वंदनाताई गौरकर, माजी उपसरपंच हेमताताई ताकसांडे, सुनीता उरकुडे, सिंधुताई लोहे, शीतल मालेकर, संगीता विधाते, लक्ष्मी चौधरी, अनिता आडे, लताताई डकरे, विलास कोदिरपाल, रमेश झाडे, जगदीश बुटले यांनी सहभाग घेतला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विस्तार अधिकारी चुने यांनी काम पाहिले.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top