- क्षेत्रात २५ कोटीच्या निधीतून मिळणार पर्यटन विकासाला चालना - आमदार सुभाष धोटे
- पुरातत्व विभागाकडून सोमेश्वर मंदिर, सिदेश्र्वर मंदिर, मानिकगढ किल्ल्याची पाहणी
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
राजुरा विधानसभा क्षेत्रातील हेमाडपंती पुरातत्त्व पर्यटन स्थळ सोमेश्वर मंदिर, सिदेश्र्वर मंदिर, मानिकगढ किल्ला येथे पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यासंदर्भात लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी महाराष्ट्राचे पर्यटन व सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांच्याकडे २५ कोटी रुपये निधीची मागणी केली आहे. यात मानिकगढ किल्ल्यासाठी १० कोटी, सिध्देश्वर मंदिरासाठी १० कोटी, सोमेश्वर मंदिरासाठी ५ कोटी रुपये निधीची मागणी आहे. त्यानुसार पर्यटन व सांस्कृतिक विभागाच्या निर्देशानुसार वरील सर्व ठिकाणी नागपूर विभागाचे पुरातत्वशास्त्रज्ञ विभागाचे उपसंचालक श्रीमती जया वाहणे यांनी आपल्या विभागातील अभियंता यांना घेऊन येथे भेट दिली. परिसराचा सविस्तर आढावा घेतला. संभाव्य अंदाजपत्रकानुसार येथे आवश्यक विकासकामांचा आराखडा तयार करून त्या संबंधित विभागाला माहिती देणार आहेत. त्यानंतर लवकरच येथे विकासकामांना सुरूवात होणार आहे
या प्रसंगी आमदार सुभाष धोटे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, आपण महाराष्ट्राचे पर्यटन व सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांच्याकडे क्षेत्रात पर्यटन विकासासाठी २५ कोटी रुपये निधीची मागणी केली आहे. यात सोमेश्वर मंदिर च्या पश्चिम दिशेकडील संरक्षण भिंतीचे संपूर्ण बांधकाम करणे, मंदिराच्या सभोवताली व संपूर्ण मंदिर परिसरात साफसफाई करणे, प्रसाधनगृहाचे बांधकाम करणे, सिध्देश्वर मंदिराचे जिर्णोद्धार करणे, मंदिराची सुशोभिकरण करणे, संरक्षक भिंत बांधणे, स्वयंपाकगृह, प्रसाधनगृह बांधणे, माणिकगड किल्ल्याचे परिसरात प्रसाधनगृह बांधकाम करणे, किल्ल्यांच्या संरक्षण भिंतीचे काम पूर्ण करणे, बुरुजाचे बांधकाम पूर्ण करणे इत्यादी विकास कामांचा समावेश आहे. अंमलनाला येथे ७ कोटी रुपये निधीतून पर्यटन विकासाचे काम सुरू झाले आहे. सोबतच वरील तिन्ही ठिकाणी लवकरच कामला सुरुवात होऊन क्षेत्रात पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे.
या प्रसंगी माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, माजी उपनगरध्यक्ष सुनील देशपांडे, मारोती येरणे, प्रभाकर येरणे, श्याम बोलम, अब्दुल अहमिद, राजेशाम कुरमावार, शंकर बोंकुर, श्रीकांत बेतावार, अब्दुल जावेद, सिताराम कोडापे, देरकर आदींची उपस्थिती होती.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.