Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: राजुरा-गडचांदूर मार्गावर अपघात
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
राजुरा-गडचांदूर मार्गावर अपघात अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन चुलत भावांचा जागीच मृत्यू आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स राजुरा - गडचांदूर-राजुरा ...
  • राजुरा-गडचांदूर मार्गावर अपघात
  • अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन चुलत भावांचा जागीच मृत्यू
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
गडचांदूर-राजुरा राज्य महामार्गावर रामपूर जवळ सास्ती ती पॉईंट जवळील रेल्वे पुलियाजवळ दि. 25 जानेवारी ला सायंकाळी ८ वाजताच्या दरम्यान आर्वीकडे जात असलेल्या मोटरसाईकलला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दोन मोटरसाईकलस्वार जागीच ठार झाले. यामुळे घटनास्थळी तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
आर्वी येथील राकेश दौलत तोडासे वय 25 व हनुमंत बापुजी तोडासे वय 30 हे कामानिमित्य राजुरा येथे आले होते. काम करून मोटारसायकल क्रमांक MH-34-CA-4576 ने परत घरी जात असताना अज्ञात वाहनाने रामपूर जवळील रेल्वे पुलियाजवळ धडक दिल्याने मोटरसाईकलस्वार जागीच ठार झाले. दोघेही सख्खे चुलत भाऊ आहे. या घटनेमुळे आर्वी गावात शोककळा पसरली आहे.
रामपूर-पोवणी-साखरी व राजुरा-आर्वी या मार्गावर रात्रंदिवस वेकोलीची कोळसा वाहतूक सुरू राहते. कोळसा वाहतुकीमुळे पहिलेच रस्त्याचे तीन तेरा वाजले आहे. वाहनधारकांना वाहन कोणत्या बाजूने टाकावे असा प्रश्न पडत असतो. मात्र बांधकाम विभाग व वेकोली प्रशासन याकडे लक्ष देत नसल्याने नेहमी अपघाताची मालिका सुरू असून यात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. रस्त्याची दयनावास्था असताना याकडे संबंधित विभाग लक्ष देत नसल्याने सामान्य नागरिकांना यात जीव गमवावा लागत आहे. पोलिसांनी भारतीय दंड संहिता 1860  कलम 279, 304-A मोटार वाहन अधिनियम 134B अन्वये गुन्हा केला असून समोरील तपास पोलीस करीत आहे. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top