- पोलीस प्रशासनाच्या कमाल तांदूळ तस्करांची धमाल
- विरुर (स्टे.) पोलीस स्टेशन हद्दीतील प्रकार
- तांदूळ तस्करीचे रॅकेट विरुर ते ब्रम्हपुरी
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
जिल्ह्यातील शेवटचे टोक असलेल्या विरुर (स्टे) येथे मागील अनेक दिवसांपासून तांदूळ तस्करीचे विरुर ते ब्रम्हपुरी, गोंदिया मोठे रॅकेट सक्रिय असून ही तस्करी हाकेच्या अंतरावर असलेल्या पोलीस स्टेशन पासून होत असल्याने पोलीस प्रशासन काय करीत आहे, असा सवाल निर्माण होत असून यांच्या भूमिकेवर संशय निर्माण होत आहे. (दि. २३) तर खुद्द पोलीस कर्मचाऱ्यांच्या समोर तांदूळ तस्कर वाहनात तांदूळ भरून नेट असताना पोलीस कर्मचारी मुकाट्याने बघत होते. यामुळे पोलीस प्रशासन रक्षक आहे की भक्षक असा प्रश्न आज स्थानिक नागरिकांना बघायला मिळाला आहे.
महाराष्ट्राचे शेवटचे टोक असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील विरुर (स्टे.) हे गाव तेलंगणा राज्याच्या सीमेवर असून या ठिकाणी तेलंगणातून येणाऱ्या रेल्वेतून तेलंगणात स्वस्त धान्य दुकानात मिळणारा एक रुपया किलो चा तांदूळ पॅकिंग बदलवून दुसऱ्या पिशवीमध्ये भरून विरुर (स्टे.) येथील रेल्वे स्टेशनवर उतरविल्या जात आहे. त्या ठिकाणी स्थानिक परिसरातील आठ ते दहा तांदूळ तस्कर आपल्या चारचाकी वाहनांनी रेल्वे स्टेशन वरील तांदूळ वाहनात भरून गोडाऊन मध्ये जमा केल्या जातो, नंतर हाच तांदूळ ब्रम्हपुरी, गोंदिया येथे जास्त दराने विकल्या जातो, तिथे या तांदळाला मिल मध्ये पिसून दुसऱ्या पिशवीत भरून लेबल लावून बाजारात जादा दाराने विक्रीळणाले जात असल्याने या मध्ये मोठे रॅकेट असून हा सर्व प्रकार, रेल्वे प्रशासन व पोलीस प्रशासन यांच्या डोळ्यासमोर होत असतांना यांच्यावर काहीच कारवाही केल्या जग नाही.
एरवी बारीक बारीक चौकशी करून आरोपीच्या कठड्यात उभे करणारे पोलीस या तस्करांसमोर हतबल होताना पाहायला मिळत आहे. पोलीस कारवाही राजकीय दडपणाखाली येऊन करत तर नाही ना, की कारवाही न करण्यामागे दुसरे काही कारण आहे. या अवैद्य धंद्याचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या सीमावर्ती भागातील विरुर (स्टे.) येथे मोठ्या प्रमाणात तस्करांचे जाळे पसरलेले आहे. अगदी पोलीस स्टेशन समोरून मार्ग आहे, याच मार्गावरुण तस्करांची ये-जा सुरू असते. असे असताना पोलीस प्रशासन तांदूळ तस्करी नसल्याचे सांगत असल्याने तस्करांना खुली सूट मिळत आहे.
राजुरा येथील काही पत्रकार वृत्त संकलन करण्यासाठी विरुर स्टेशन येथे गेले असता, विरुर येथील रेल्वे स्टेशन च्या मागच्या बाजूला असलेल्या रेल्वे लाईन लगत सात ते आठ चार चाकी वाहने झुडपा आड उभी करून रेल्वे स्टेशन च्या सुरक्षा भिंतीच्या खिडकीतून वीस ते तीस पुरुष छुप्या मार्गाने एका बाजूने तांदळाच्या पिशव्या देत होते तर दुसऱ्या बाजूने वाहनात टाकत असल्याचे दिसले, याबाबतची माहिती विरुर पोलीस स्टेशन येथे दिली असता हाकेच्या अंतरावरील असलेले पोलिसकर्मी अर्धा तास होऊन येत नसल्याने पत्रकार पोलीस स्टेशन येथे पोहचून ड्युटीवर असलेल्या पवार या कर्मचाऱ्यास माहिती दिली मात्र तेव्हाही पोलीस कर्मी पाठविण्यास विलंब झाला, पोलीस कर्मचारी रवानगी टाकून तांदूळ भरत असलेल्या वाहनाकडे गेले मात्र एक तास लोटला तरी परत आले नसल्याने पत्रकारांनी रस्त्याकडे पाहणी केली असता तांदूळ तस्कर व पोलीस कर्मचारी पोलीस स्टेशनच्या गेट जवळ बसून गप्पा करीत होते व त्यांच्या समोरून तांदूळ भरून चारचाकी वाहन जात असल्याचा धक्कादायक प्रकार दिसला असता पत्रकारांना पाहून पोलीसकर्मी यांनी त्याठिकानाहून काढता पाय घेतला.
रेल्वे स्टेशनवर आलेला तांदूळाची चौकशी करण्याकरिता आमचे पोलीस कर्मचारी जाऊन खात्री केली असता तेलंगणातील माकोडी व कागजनगर येथील रेल्वे स्टेशन वरून आलेल्या शेतकऱ्यांना विचारले असता काही तांदूळ विकण्यासाठी व नातेवाईकांना देण्यासाठी आणला असल्याचे सांगितले त्यामुळे आलेला तांदूळ कोणत्याही प्रकारचा अवैद्य नसून वैद्य आहे यामुळे कारवाही करता येणार नाही.- राहुल चव्हाण, पोलीस निरीक्षक विरुर (स्टे.)
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.