Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: नैराश्येपोटी पत्नी-मुलगा-मुलीवर चाकूने वार करून घेतला गळफास
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
नैराश्येपोटी पत्नी-मुलगा-मुलीवर चाकूने वार करून घेतला गळफास आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स नागपूर - कर्जबाजारी पतीने पत्नी व दोन मुलांची हत्...

  • नैराश्येपोटी पत्नी-मुलगा-मुलीवर चाकूने वार करून घेतला गळफास
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
नागपूर -
कर्जबाजारी पतीने पत्नी व दोन मुलांची हत्या करून स्वत: गळफास घेतला. ही थरारक घटना मंगळवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास जरीपटक्यातील दयानंद पार्कजवळील हाऊसिंग बोर्ड सोसायटी येथे उघडकीस आली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. मदन अग्रवाल वय ४०, त्यांच्या पत्नी किरण वय ३३, मुलगा वृषभ वय १० आणि मुलगी टिया ऊर्फ तोषिता वय ५, अशी मृतांची नावे आहेत. मदन यांचा दयानंद पार्क परिसरात मदन चायनीज ठेला आहे. वृषभ हा सहावीत, तर टिया ही पहिल्या वर्गात शिकायची. एकाचवेळी चौघाच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मदन यांना जुगाराचे व्यसन होते. त्यांच्यावर सुमारे ६० ते ७० लाखांचे कर्ज झाले. कर्जबाजारी झाल्याने ते तणावात राहायला लागले. सोमवारी ते कुटुंबासह तुलसीनगर येथे राहणाऱ्या भावाकडे गेले. सायंकाळी ते घरी परतले. रात्री त्यांनी आधी किरण यांच्या गळ्यावर चाकूने वार केले. किरण यांनी प्रतिकार केला असता त्यांच्या हातावरही मदनने चाकूने वार केले. पोटावर वार करून मदन यांनी किरण यांना ठार मारले. त्यानंतर चाकूने गळा चिरून मुलगा वृषभ आणि मुलगी टियाची हत्या केली. त्यानंतर पंख्याला दोरी बांधली. बादलीवर उभे राहून मदन यांनीही गळफास घेत आत्महत्या केली. मंगळवारी सकाळी त्यांच्या नातेवाइकांनी मदन यांच्या मोबाइलवर संपर्क साधला. मात्र, मदन यांनी प्रतिसाद दिला नाही. दुपारी ४ वाजताच्या सुमारास मदन यांचा मित्र त्यांच्याकडे आला. त्याने आवाज दिला मात्र प्रतिसाद न मिळाल्याने त्याने भिंतीवर उडी घेतली. दरवाजा आतून बंद होता. त्याने दरवाजा ठोठावला. आतून आवाज आला नाही. खिडकीतून बघितले असता मदन हे त्याला गळफास लावलेल्या अवस्थेत दिसले. त्याने शेजारी व पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. नियंत्रण कक्षाने जरीपटका पोलिसांना कळविले. दरम्यान, मदन यांच्या भावाचे किराणा दुकान आहे. सोमवारी ते भावाकडे गेले. सायंकाळी घरी परतले. रात्री ९ वाजताच्या सुमारास त्यांनी भावाच्या मोबाइलवर संपर्क साधून १५०० रुपयांची मागणी केली. त्यांच्या भावाने मदन यांना ऑनलाइन १५०० रुपये दिले. त्यांनी भावाला कशासाठी पैसे मागितले याचे रहस्य मात्र गुलदस्त्यात आहे. बँकेचे हप्ते थकित झाले. त्यामुळे तीन महिन्यांपूर्वी बँकेने त्यांच्या दयानंद पार्क परिसरातील प्रशस्त घराला सील ठोकले. तेव्हापासून ते हाऊसिंग सोसायटीतील निमजे यांच्याकडे भाड्याने राहायचे. 

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top