- "मी अन माझे भावविश्व" निबंध स्पर्धेचे पुरस्कार वितरण संपन्न
- प्रेमांजली महिला बहुउद्देशीय संस्थेतर्फे पत्रकार दिनी पत्रकारांचा सन्मान
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
प्रेमांजली महिला बहुउद्देशीय संस्था राजूराच्या वतीने नगाजी सभागृहात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्याने "मी अन माझे भावविश्व" या निबंध स्पर्धेचे पुरस्कार वितरण तसेच आद्य पत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती मराठी पत्रकार दिन म्हणून साजरी केली जाते. या दिनी पत्रकारांचा यथोचित सन्मान करून त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा. उदात्त हेतुने पत्रकारांचा हि सत्कार करण्यात आला. तत्पूर्वी अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांना दोन मिनिटाचे मौन पाळून भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली.
कार्यक्रमाचे उद्घाटन तुळसाबाई कळसे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रम अध्यक्ष साधना येरमे, प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. महेश गेडाम, श्री शिवाजी महाविद्यालय, निबंध परिक्षक सुप्रसिद्ध लेखक डॉ. किशोर कवठे, सत्कारमूर्ती पत्रकार सुरेश साळवे, अनिल बाळसराफ आणि दिपक शर्मा यांच्या संस्थेच्या वतीने शाल, सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. निबंध पुरस्कार प्राप्त कु. सुहानी गजानन पिंगे पाचगांव, प्रथम क्रमांक श्री शिवाजी काँलेज राजूरा, कु.पल्लवी सुभाष पिंपळकर पंढरपोवनी, द्वितीय क्रमांक श्री शिवाजी काँलेज कु मयुरी सुभाष वाटकर रामपुर, तृतीय कमांक प्रियदर्शिनी कालेज ला देण्यात आला.
यावेळी "मुलींच्या लग्नाचे वय एकविस वर्षे योग्य कि अयोग्य" यावर मुलींनी आपले विचार मांडले. प्रत्येक मुलींनी २१ वर्षे वय एकदम योग्य असून याचा शिक्षणात फायदा होण्याचे सांगितले.
प्रस्तावना संचालिका अध्यक्ष सौ. चित्रलेखा धंदरे यांनी, संचालन प्रा.सौ. भावना रागीट तर आभार गीता घरत यांनी केले. यावेळी सौ. सिंधु चव्हाण, सौ वच्छला चौधरी, सौ. अल्का कोसुरकर, सौ. चंदा ओझा सौ. गीता गायकी, सौ. गीरजा परचाके, सौ. सुनिता कुंभारे व पुरस्कार प्राप्त मुलींचे आई वडिल आणि अनेक महिला उपस्थित होत्या.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.