Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: महाराजस्व अभियान अंतर्गत कोलाम बांधवांना आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
महाराजस्व अभियान अंतर्गत कोलाम बांधवांना आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स राजुरा - महाराजस...

  • महाराजस्व अभियान अंतर्गत कोलाम बांधवांना आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
महाराजस्व अभियान अंतर्गत मौजा पिपळंगाव येथील आदिवासी कोलम बांधवांना विविध प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. यात १९ शिधापत्रिका, ५० जात प्रमाणपत्र आणि संजय गांधी निराधार योजना ४ लाभार्थीना शासकीय प्रमापत्र प्रदान करण्यात आले. या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार सुभाष धोटे यांनी सांगितले की, शासन नेहमीच सर्व सामान्य नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. या भागातील आदिवासी, कोलाम बांधवांच्या काही समस्या आहेत, रस्ते, पाणी आणि इतर या सर्व समस्या सोडविण्यासाठी आपण अवश्य पाठपुरावा करून येथे येणाऱ्या काळात सुविधा उपलब्ध करून देऊ असे आश्वासन दिले. 
या प्रसंगी उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, तहसीलदार हरिष गाडे, नायब तहसीलदार गांगुर्डे, गाव पाटील रामचंद्र पाटील कुरसंगे, माजी सरपंच रामचंद्र जाबोर, उपसभापती मंगेश गुरनुले, डोनगावकर, पूरवठा अधिकारी गंभीरे, मंडळ अधिकारी साळवे, तलाठी रमेश मेश्राम, राहुल श्रीरामवार, सरिता शेरकर, सोयाम, भिमया अंगलवार यासह स्थानिक नागरिक उपस्थीत होते.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top