Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: खाणीतून कोळसा घेऊन जाणारा ट्रॅक्टर पकडला ; ६ लाख ३० हजाराचा मुद्देमाल जप्त
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
खाणीतून कोळसा घेऊन जाणारा ट्रॅक्टर पकडला ६ लाख ३० हजाराचा मुद्देमाल जप्त आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स राजुरा - वेकोलिच्या सास्ती ओपनकास्ट ...

  • खाणीतून कोळसा घेऊन जाणारा ट्रॅक्टर पकडला
  • ६ लाख ३० हजाराचा मुद्देमाल जप्त
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
वेकोलिच्या सास्ती ओपनकास्ट कोळसा खाणींतून कोळसा तस्करांनी कोळसा चोरी करून नेत असताना महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान राहुल राठोड, लक्ष्मण पाटील यांनी नंबर नसलेल्या ट्रॅक्टर ला पाठलाग करून गोवरी कॉलनी वरुन 2 कि.मी. अंतरावर पकडले. 30 हजार रुपये किमतीचा सुमारे 3 टन कोळसा आणि 6 लाख रुपये किमतीचा ट्रॅक्टर असा एकूण 6 लाख 30 हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. 
सुरक्षा रक्षकांनी अधिक विचारपूस करत चौकशी केली असता, चालकाने आपले नाव प्रकाश नरसिंग कामपेल्ली वय 35 वर्ष रा. बल्लारशाह येथील रहिवासी असल्याचे सांगितले. त्याला अटक करण्यात आली. कोळसा माफिया बल्लारपूरचा रहिवासी जगना उर्फ ​​जग्गा याच्या सांगण्यावरून चोरी करत असल्याचे त्याने सांगितले. वरील माहिती महाराष्ट्र सुरक्षा दलाचे सुरक्षा अधिकारी कोंढाळकर व वेकोलिचे सुरक्षा अधिकारी राजूरकर यांना देण्यात आली. आरोपींसह ट्रॅक्टर ट्रॉली आणि कोळसा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे. पोलिसांनी कलम ३७९, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. वाढत्या चोरीला आळा लावण्याचे काम सुरू असले तरी त्या प्रमाणात सुरक्षा कर्मचारी व पोलिसांचे सहकार्य मिळत नसल्याचे संबंधित यंत्रणेतील काही लोकांचे म्हणणे आहे. तशी कारवाई करण्याची आमची तयारी आहे, मात्र संबंधित विभागांकडून सहकार्य अपेक्षित आहे असे सुरक्षा यंत्रणेतील लोकांनी सांगितले. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top