Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: लेखापालावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेदार्थ काळ्या फिती लावून तीव्र निषेध
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
लेखापालावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेदार्थ काळ्या फिती लावून तीव्र निषेध जिवती नगर पंचायतच्या लेखापालवर झाला होता हल्ला गडचांदूर नगर पर...

  • लेखापालावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेदार्थ काळ्या फिती लावून तीव्र निषेध
  • जिवती नगर पंचायतच्या लेखापालवर झाला होता हल्ला
  • गडचांदूर नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी काळ्या फिती लावून निषेध नोंदविला
  • मुख्याधिकारी डॉ. विशाखा शेळकी यांना दिले निवेदन
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
कोरपना -
जिवती नगर पंचायत चे लेखापाल सागर कुऱ्हाडे यांचेवर 10 जानेवारी ला कार्यालयात अरेरावी भाषेत शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली. सागर कुऱ्हाडे यांचा मोबाईल व लॅपटॉप फेकून तोडफोड हि करण्यात अली. या घटनेचा विरोधात गडचांदूर येथील नगर परिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तीव्र निषेध नोंदवला व सर्व कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून काम केले.
महाराष्ट्र राज्य नगर परिषद संवर्ग अधिकारी संघटनाच्या वतीने मुख्याधिकारी डॉ. विशाखा शेळकी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी प्रशासकीय अधिकारी चरणदास शेडमाके, अभियंता स्वप्नील पिदूरकर प्रीतिष मगरे, लेखापाल मनोज कुंभारे अमित निमकर, कपिल नल्लेवार, लिपिक संतोष गोरे, बंडू वांढरे, विशाल मंगरुळकर, सचिन खनके आदी नप कर्मचारी उपस्थित होते.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top