Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: खिर्डी येथे आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते व्यायाम शाळेचे भूमिपूजन संपन्न
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
खिर्डी येथे आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते व्यायाम शाळेचे भूमिपूजन संपन्न विकास निधीमधून 20 लक्ष रुपये खर्च करून होणार निर्माण धनराजसिंह शेख...

  • खिर्डी येथे आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते व्यायाम शाळेचे भूमिपूजन संपन्न
  • विकास निधीमधून 20 लक्ष रुपये खर्च करून होणार निर्माण
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
खिर्डी येथे खनिज विकास निधीमधून 20 लक्ष रुपये खर्च करून निर्माण होणाऱ्या व्यायाम शाळेचे भूमिपूजन आमदार सुभाष भाऊ धोटे यांच्या शुभ हस्ते नुकतेच करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून कोरपना तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विठ्ठलराव थिपे, अभियंता शंभरकर, ग्रामसेविका उईके, पोलीस पाटील रामदास तोडासे, माजी उपसपंच पुरुषोत्तम राजूरकर, तंटामुक्ती अध्यक्ष धनराज मालेकर, शुभकांत शेरकी, दीपक खेकारे, रामचंद्र वायकोर, रविंद्र मुक्के, तुकडीदास मांडवकर, कोहपरे महाराज, दत्तू हिवरकर, अमोल गायकवाड, शत्रपती धोटे, नत्तू सत्रे, रामदास ढवस, विठ्ठल गोहणे, गोपाल मांडवकर तसेच गणपत नगर मधील नागरिक व महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन श्री. शंकर शिटलवार यांनी केले.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top