Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वडगाव येथे शाळा व्यवस्थापन समितीची स्थापना
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वडगाव येथे शाळा व्यवस्थापन समितीची स्थापना  धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी गडचांदूर - पंचायत समिती...


  • जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वडगाव येथे शाळा व्यवस्थापन समितीची स्थापना 
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
पंचायत समिती कोरपना अंतर्गत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वडगाव येथे नुकतीच शाळा व्यवस्थापन समितीची स्थापना शासन निर्णयानुसार व कोरोना संसर्गाच्या नियमावलीच्या अधिनस्त राहून करण्यात आली. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीची रचना व त्यांची कर्तव्य अधिकार या विषयी ची संपूर्ण माहिती उपस्थित पालकांना देण्यात आली. तसेच शाळा विकासात शाळा व्यवस्थापन समितीची महत्त्वाची भूमिका स्पष्ट करण्यात आली. यावेळी खेळीमेळीच्या वातावरणात सर्व उपस्थित पालकांमधून शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांची निवड करण्यात आली.
अध्यक्ष म्हणून श्रीराम नथ्थु पाचभाई तर उपाध्यक्ष म्हणून वनीता ब्रह्मकिशोर पिंपळकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली, तसेच सदस्य म्हणून संगीता संदीप मडावी, प्रदिप महादेव आंबेकर, मनीषा कैलास कुचनकर प्रदीप सुभाष बावणे श्रीकांत नागोबा निखाडे रसिका सुभाष राऊत शंकर महादेव मोहितकर रत्नमाला मनीराम झाडे ज्ञानेश्वर गोविंदा ढवळे विठ्ठल बालाजी मडावी जयेंद्र बाबुराव बावणे कलावती किशोर गुरनुले यांची पालकांमधून निवड करण्यात आली तसेच सदस्य सचिव म्हणून पांडुरंग करनूजी बुरांडे तर शिक्षण प्रेमी म्हणून सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्रीराम दत्तुजी भोंगळे सर आणि शिक्षक प्रतिनिधी म्हणून काकासाहेब बाबुराव नागरे  यांची निवड करण्यात आली यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष दिलीप बालाजी पावडे माजी सरपंच मोहपतराव मडावी व पालक उपस्थित होते तसेच अशोक पडाल शिवाजी माने अनिल राठोड व नितीन जुलमे हे शिक्षक उपस्थित होते.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top