Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: गडचांदुर शहरात महाराजस्व अभियानचे आयोजन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
गडचांदुर शहरात महाराजस्व अभियानचे आयोजन महात्मा गांधी विद्यालय येथे कार्यक्रम संपन्न धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी गडचांदूर - औद्...

  • गडचांदुर शहरात महाराजस्व अभियानचे आयोजन
  • महात्मा गांधी विद्यालय येथे कार्यक्रम संपन्न
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
औद्योगिक शहर म्हणून ओळखले जाणाऱ्या व तालुक्यातील सर्वात मोठी बाजार पेठ असणाऱ्या गड़चांदुर शहरात सोमवारी (3 जानेवारी) महात्मा गांधी विद्यालय येथे तहसील कार्यालय कोरपना तर्फे एक दिवसीय महाराजस्व अभियान सन 2021 -22 चे आयोजन करण्यात आले. या अभियानान्तर्गत, शैक्षणिक दाखले, जाती प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, शेती सातबारा तसेच इतर प्रमाणपत्र ची माहिती देण्यात आली व संपूर्ण योजना चा लाभ मिळवून देण्यात आला. शालेय विद्यार्थी व गावातील अनेक नागरिकांनी याचा लाभ घेतला. या वेळी नायब तहसीलदार श्री प्रवीण चिड़े, मंडळ अधिकारी एन. चव्हाण, पटवारी एम.एस. अंसारी, गावंडे, प्रणीता मालेकर, मनीषा मलेकर, विनोद खंडाले, उद्धव पूरी व इतर उपस्थित होते.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top