Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक - अक्टिव्ह बाधित आठशेच्या वर
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक - अक्टिव्ह बाधित आठशेच्या वर  एकाच दिवशी नव्याने 227 बाधितांची भर मनपा क्षेत्रात दररोज 100 पार चंद्रपूर जिल्हा - आ...
  • जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक - अक्टिव्ह बाधित आठशेच्या वर 
  • एकाच दिवशी नव्याने 227 बाधितांची भर
  • मनपा क्षेत्रात दररोज 100 पार
  • चंद्रपूर जिल्हा - आजचे कोरोना अपडेट
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
दि. 13 जानेवारी :  कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येत लगातार वाढ होत असून जिल्ह्यात ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या आठशेच्या वर पोहचली आहे. गत 24 तासात जिल्ह्यात 41 जणांनी कोरोनावर मात केली असून त्या रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 227 नवीन रुग्ण बाधीत झाले आहे. जिल्ह्यात गुरुवारी मृत्यू संख्या शून्य आहे.
आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात 100, चंद्रपूर 32,बल्लारपूर 29, भद्रावती 9, नागभीड 3, मुल 16, सावली 3, पोंभूर्णा 1, राजुरा 5, चिमूर 5, वरोरा 11, कोरपना 12 तर जिवती येथे 1 रुग्ण आढळून आले असून ब्रह्मपुरी, सिंदेवाही, गोंडपिपरी व इतर ठिकाणी बाधित रुग्णांची संख्या शून्य आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 89 हजार 856 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 87 हजार 442 झाली आहे. सध्या 869 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 8 लाख 15 हजार 167 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 7 लाख 23 हजार 686 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1545 बाधितांचे मृत्यू झाले आहे.
प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top