आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
ब्रम्हपुरी -
ब्रम्हपुरी तालुक्यातील रुई गावाजवळील रनमोचन फाट्याजवळ आज सकाळी 8 वाजताच्या सुमारास कार आणि ट्रॅक्टरचा झालेल्या जोरदार धडकेत एक जण जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार गडचिरोली जिल्यातील चामोर्शी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अतुल गण्यारपवार आणि त्यांचे चुलतबंधू आनंद गण्यारपवार हे कार ने ब्रह्मपुरी मार्गे नागपूरला कामानिमित्त जात असताना ब्रह्मपुरी तालुक्यातील रणमोचन येथे त्यांच्या कार आणि ट्रॅक्टरचा अपघात झाला. या अपघातात अतुल गण्यारपवार गंभीर जखमी झाले तर त्यांचे चुलतबंधू आनंद गण्यारपवार यांचा घटनास्थळी मृत्यू झाला. हा अपघात एवढा भीषण होता की ट्रॅक्टरचे चक्क दोन तुकडे झाले. दरम्यान पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्तांना दवाखान्यात दाखल केलं आहे. पुढील तपास ब्रह्मपुरी पोलीस करीत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.