Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: ब्रेकिंग न्यूज - नवीन वर्षात दुःखद घटना वाघाच्या हल्ल्यात गुराख्याच्या मृत्यू
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
ब्रेकिंग न्यूज - नवीन वर्षात दुःखद घटना  वाघाच्या हल्ल्यात गुराख्याच्या मृत्यू आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स सावली - जनकापूर रिठ येथील गुरा...

  • ब्रेकिंग न्यूज - नवीन वर्षात दुःखद घटना 
  • वाघाच्या हल्ल्यात गुराख्याच्या मृत्यू
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
सावली -
जनकापूर रिठ येथील गुराखी विनोद नामदेव ठाकरे वय 48 वर्ष हे आज सकाळी गावातील गुरे चराई करिता जंगलात गेले असता कान्हाळगाव रस्त्याच्या बाजूला दबा धरून असलेल्या वाघाने कंपार्टमेंट नं. 147 मध्ये गुरख्यावर हल्ला करून जागीच ठार केले. जनकापूर रिठ गावाला लागूनच असलेल्या जंगलात ही घटना घडली. मृत व्यक्तीच्या कुटुंबात पत्नी, दोन मुले आणि सासू असा परिवार आहे. घरची परिस्थिती बिकट असून मोलमजुरी करून कसे बसे कुटुंबियांचे पॉट भरणाऱ्या घरचा कमावताच धनी गेल्याने ठाकरे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top