Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: जिप जनसुविधा कामाअंतर्गत खामोनात ६ लाखांच्या कामाला मंजुरी सरपंच हरिदास झाडे यांच्या पाठपुराव्याला यश
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
जिप जनसुविधा कामाअंतर्गत खामोनात ६ लाखांच्या कामाला मंजुरी सरपंच हरिदास झाडे यांच्या पाठपुराव्याला यश आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स राजुरा ...
  • जिप जनसुविधा कामाअंतर्गत खामोनात ६ लाखांच्या कामाला मंजुरी
  • सरपंच हरिदास झाडे यांच्या पाठपुराव्याला यश
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
ग्रामपंचायतीची प्रशासकीय व तांत्रिक मान्यतेनुसार जिल्हा परिषद जनसुविधा कामाअंतर्गत जिल्हा नियोजन समितीला सादर यादीतील निधीला व कामांना प्रशासकीय व तांत्रिक मान्यता देण्यात आली असून दि. ३ डिसेंबर २०२१ रोजीच्या स्थायी समितीच्या शिफारशी प्रमाणे राजुरा तालुक्यातील खामोना ग्रामपंचायतीतील मीराबाई ठक ते उद्धव गिरसावळे यांच्या प्लॉट पर्यंत सीसी रोड करिता ३ लाख रुपये तसेच प्रकाश मोरे यांच्या घरापासून श्री हनुमान मंदिरापर्यंत सीसी रोड करिता ३ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे. सदर कामाकरिता सरपंच हरिदास झाडे यांनी सतत पाठपुरावा केला होता. जिप अध्यक्षा संध्याताई गुरुनुले व जिप सभापती सुनील उरकुडे यांनी सरपंच हरिदास झाडे यांनी केलेल्या पाठपुराव्याची दखल घेत निधी मंजूर करून दिला. सदर कामासाठी निधी मंजूर झाल्याने लवकरच कामाला सुरुवात होणार असून गावातील नागरिकांनी याबद्दल समाधान व्यक्त केले आहे. 

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top