- अखेर मृत कामगाराच्या कुटुंबियांना साडे सात लाख रुपये देण्याचे कबूल
- गडचांदूरतील अल्ट्राटेक सिमेंट कंपनीत कामगार मृत्यू प्रकरण शांत
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
गडचांदूर येथील अल्ट्राटेक सिमेंट कंपनीत 26 जानेवारी ला सकाळी साडे दहा वाजता प्रकाश देवाजी पवार वय 43 वर्ष या कामगाराचा कामावर असतांना मृत्यू झाला होता. रात्री उशिरा झालेल्या बैठकीत मृतक कामगाराच्या कुटुंबियांना साडे सात लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे कंपनी प्रशासनाने कबूल केल्याची माहिती मिळाली आहे.
मृतक कामगार अनेक वर्षापासून कंपनीत ठेकेदारी पद्धतीत कामावर होता. कामगाराच्या मृत्यूची बातमी सकाळी 10.30 वाजता वाऱ्या सारखी शहरात पसरल्याने अनेक कामगार, सामाजिक संघटना व इतर पक्षातील पदाधिकारी यांनी रुग्णालयात धाव घेतली. कंपनी कामगाराला नुकसान भरपाई देण्याची टाळाटाळ करीत असल्याने, योग्य मोबदला मिळण्यासाठी कामगारांनी मृत कामगाराचे शव कंपनीच्या गेट समोर ठेवत नुकसान भरपाईची मागणी करीत आंदोलन सुरू केले होते. कंपनी प्रशासनाने 3 लाख देण्याचे कबूल केले पण मृतकाचे कुटुंबिय कमीत कमीत दहा लाख रुपयांची मागणी वर अडले होते. दहा लाख रुपयांची आर्थिक मदतची मागणी करत त्याच्या परिवारातील लोकांनी कामगाराचे मृतदेह कंपनीच्या मुख्य गेट समोर ठेऊन जो पर्यंत आर्थिक सहायता प्राप्त होत नाही तो पर्यंत कामगाराचे मृतदेह गेटवरून उचलणार नाही असे स्पष्ट बजावले होते. संध्याकाळी 6.00 वाजता पासून 3 तास उलटूनही कंपनी प्रशासनने कोणताच तोडगा न काढल्याने तिथे उपस्थित कामगारांचे असंतोष वाढत होते. स्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय अधिकारी सुशील कुमार नायक यांच्या मार्गदर्शनात गडचांदुर पोलीस स्टेशन चे ठाणेदार सत्यजित आमले यांनी कडक पोलिस बंदबस्त लावले होते.
यावेळी विजय क्रांती कंत्राटी कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय ठाकरे, सुनील ढवस सचिव विक्रांकासं सचिन भोयर जिल्हा उपाध्यक्ष शिवसेना, प्रहार जनशक्ती पार्टी चे तालुकाध्यक्ष सतीश बिडकर, नगराध्यक्ष सविता टेकाम, राकाँचे नप उपाध्यक्ष शरद जोगी, नगरसेवक विक्रम येरणे, शिवसेना नगरसेवक सागर ठाकूरवार सोबतच गावातील अनेक नेते आणि कामगार आणि गावातील शेकडो नागरिक कामगाराच्या मागणीला समर्थन देत मुख्य गेटवर जमले होते. मृत्यकाच्या नातेवाईकांशी विविध पक्षांच्या राजकीय पदाधिकारी व सामाजिक संघटना च्या वतीने नुकसान भरपाई बाबत मध्यस्ती करून कंपनी प्रशासनाने रात्री 10 वाजता कुटुंबियां सोबत बैठक घेतली. तडजोड अंती मृतक कामगाराच्या परिवाराला कंपनी तर्फे साडे सात लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे कबूल केल्याची माहिती मिळाली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.